एक्स्प्लोर

सिनेमात मिथुन चक्रवर्तीची बहीण, रेप सीनमुळे अभिनेत्री झाली होती फेमस; नंतरच्या काळात केले हिट सिनेमे

Shilpa Shirodkar : सिनेमात मिथुन चक्रवर्तीची बहीण, रेप सीनमुळे अभिनेत्री झाली होती फेमस; नंतरच्या काळात केले हिट सिनेमे

Shilpa Shirodkar : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी संघर्षमय प्रवास करुन यश मिळवलं. मात्र, बऱ्याच कोणत्या सीनमुळे किंवा भूमिकेमुळे अभिनेत्री प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिला तिच्या पहिल्याच चित्रपटातील रेप सीनमुळे प्रसिद्ध झाली होती.  अभिनेता सुनील शेट्टीसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. या अभिनेत्रीला पहिला ब्रेक ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी दिला होता.

36 वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटातील रेप सीनमुळे ती चर्चेत आली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर, जिने 90 च्या दशकात अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम केलं.

शिल्पा शिरोडकरला तिच्या करिअरच्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सिनेसृष्टीत नाव कमवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. इतकंच नाही, तर करिअर सुरू होण्याआधीच तिला ‘अपशकुनी’ (मनहूस) असा शिक्का बसला होता, कारण तिचे पहिले दोन चित्रपट फ्लॉप झाले होते.

अलीकडेच झूमला दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने सांगितलं की, तिला इंडस्ट्रीत ‘मनहूस’ म्हटलं जाऊ लागलं होतं. 1986 साली ती दिग्दर्शक सावन कुमार यांच्या ‘सौतन की बेटी’ या चित्रपटातून डेब्यू करणार होती. चित्रपटाच्या मुहूर्तावेळी ती उपस्थित होती, पण दोन वर्षे झाली तरी चित्रपटाबद्दल काहीच हालचाल झाली नाही.

शिल्पा म्हणाली, “एक दिवस दिग्दर्शकांनी मला सांगितलं की, ते हा चित्रपट बनवणार नाहीत. बाहेरून काही ऑफर्स मिळाल्या, तर स्वीकार.” अशा प्रकारे तिचा पहिला चित्रपट बंद पडला. यानंतर ती बोनी कपूर आणि सुरिंदर कपूर यांना भेटली. बोनी कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर यांना शिल्पा आवडली आणि त्यांनी तिला संजय कपूरसोबत 'जंगल' या चित्रपटात घेण्याचं ठरवलं.

पण नंतर त्यांनी ‘जंगल’चा विचार सोडून ‘प्रेम’ बनवण्याचं ठरवलं. त्यामुळे दुसरा चित्रपटही रद्द झाला. तरीही शिल्पाने हार मानली नाही आणि अखेर तिला ‘भ्रष्टाचार’ हा पहिला चित्रपट मिळाला. शिल्पा म्हणाली की, 'भ्रष्टाचार' मिळण्यापूर्वी इंडस्ट्रीमध्ये तिच्याबद्दल अनेक चर्चाच सुरू झाल्या होत्या. ती म्हणाली, “माझ्याबद्दल असं बोललं जाऊ लागलं की मी ज्या चित्रपटात साइन करते, तो बंद होतो. त्यामुळे मला मनहूस म्हणायला लागले.”

याच दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी शिल्पाला सपोर्ट केला आणि तिला ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटात काम मिळवून दिलं. 1989 मध्ये आलेल्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, रेखा आणि अनुपम खेर प्रमुख भूमिकांमध्ये होते. शिल्पा म्हणाली, “भ्रष्टाचार या चित्रपटातल्या रेप सीन आणि गाण्यामुळे मी प्रसिद्ध झाले. मला हे एक ईश्वरदत्त संधी वाटली. रमेश सिप्पी, अनुपम खेर, मिथुन दा, रेखा जी यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.” ती पुढे म्हणाली, “आज मी जे काही आहे, ते त्या संधीमुळेच आहे. जर तोही चित्रपट मिळाला नसता, तर आज मी तुमच्या समोर बसलेली नसते.”

यानंतर शिल्पा ‘त्रिनेत्र’, ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘आंखें’, ‘बेवफा सनम’, ‘मृत्यु दंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. ‘गोपी किशन’ या चित्रपटात सुनील शेट्टीसोबत तिची जोडी प्रेक्षकांनी विशेष पसंत केली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'अंडरवेअर छोडके सब तेरा...' Munna Bhai MBBS मधील स्वामीने 22 वर्षानंतर सांगितला किस्सा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget