सारंग साठ्ये आणि पॉलाची ओळख कशी झाली? पहिल्यांदा कुठे भेटले?
Sarang Sathaye and Paula McGlynn : सारंग साठ्ये आणि पॉलाची ओळख कशी झाली? पहिल्यांदा कुठे भेटले?

Sarang Sathaye and Paula McGlynn : काही महिन्यांपूर्वी देशभरात प्रसिद्ध झालेल्या छावा या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाच्या मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र, या तिघांच्या भूमिकांशिवाय सिनेमातील शिर्के बंधूंची भूमिका साकारणारे कलाकारही तेवढेच चर्चेचा विषय ठरले. छावा सिनेमात शिर्केची भूमिका अभिनेता सारंग साठ्ये (Sarang Sathaye) याने साकारलेली पाहायला मिळाली. सारंग साठ्येने यापूर्वीही अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. शिवाय भाडिपाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा देखील प्रयत्न करत असतो. दरम्यान, सारंग साठ्येने एका मुलाखतीत त्याची पत्नी पॉला (Paula McGlynn) त्याला पहिल्यांदा कुठे भेटली? ओळख कशी झाली? याबाबत त्याने खुलासा केलाय.
टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमची पहिली भेट झाली
सारंग साठ्ये म्हणाला, आमची पहिली भेट 2012 मध्ये झाली. टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमची पहिली भेट झाली. तिथे पार्टीमध्ये आम्ही भेटलो होतो. मी एका फिल्ममुले तिकडे गेलो होतो. पॉलाची देखील तिथे एक शॉर्ट फिल्म होती,. त्या फेस्टिव्हलमधील पार्टीमध्ये आम्ही भेटलो. आम्ही ओझरतो जेमतेम दीड मिनीट बोललो असेल. कदाचित तेवढंही नाही.
'पॉला तिथं असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणार होती'
पुढे बोलताना साठ्ये म्हणाला, त्यानंतर वर्षभरानंतर आम्ही पुण्यात एका फिल्मसाठी कास्टिंग करत होतो. अपघाताने पॉला तिथं असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणार होती. यापूर्वी ती भारतात दोनदा येऊन गेली होती. कॉलेजच्या स्कॉलरशीप वगैरे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ती भारतात येऊन गेली होती. फिल्म फेस्टिव्हल पाहायला देखील आली होती. त्यानंतर ती तिसऱ्यांदा आली होती. यावेळी आम्ही भेटलो. आमचा डायरेक्टर म्हणाली की, माझी असिस्टंड डायरेक्टर येत आहे. तू मुंबईतचं आहे तर जाऊन पिकअप करशील.. आणि ती पॉला होती. तिला मी त्यादिवशी पुन्हा भेटली. तेव्हापासून आमच्या गप्पा चालू झाल्या, त्या अजूनही चालू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























