Abhishek Kumar Reveals Casting Couch Experience: 'त्या Gay नं मला नको तिथे स्पर्श केला...'; सलमान खानच्या शोमध्ये झळकलेल्या अभिनेत्यासोबत घडलेलं नको ते कृत्य
Abhishek Kumar Reveals Casting Couch Experience: प्रसिद्ध अभिनेत्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे तो खूप घाबरला. तो घाबरला आणि रडत रडत त्यानं त्याच्या आईला फोन केला.

Abhishek Kumar Reveals Casting Couch Experience: सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss) या रिअॅलिटी शोमध्ये उपविजेता ठरलेला अभिषेक कुमार (Abhishek Kumar) सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता अभिषेक त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच त्यानं पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अभिषेक कुमारनं सांगितलं की, त्यालाही एक दिवस कास्टिंग काऊचचा (Casting Couch) सामना करावा लागला होता. ज्यामुळे तो खूप घाबरला. तो घाबरला आणि रडत रडत त्यानं त्याच्या आईला फोन केला.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिषेक कुमार म्हणाला की, "एकदा माझ्यासोबत एक घटना घडलेली. टची-टची सा कुछ हो गया था... कोई गे था... त्यानं मला नको तिथे स्पर्श केला... मुंबईत दीड-दोन महिने राहिल्यानंतरच गोष्ट आहे. मी खूप घाबरलो आणि मला वाटलं की,.... म्हणजे, फारसं काही घडलं नव्हतं, पण त्यानं माझ्यासोबत प्रयत्न केला की, तुझे ऐसा करना पड़ेगा तभी तू आगे बढ़ेगा... ही गोष्ट तेव्हाची आहे, ज्यावेळी मी जवळपास 2 महिन्यांपर्यंत मुंबईत होतो."
अभिषेक कुमारसोबत कास्टिंग काऊच
अभिषेक कुमार म्हणाला की, "त्यावेळी मी माझ्या घरी सांगितलं नव्हतं की, मुंबईत आहे. त्यांना सांगितलेलं की, मी दिल्लीत ट्रेनिंग करतोय. मग मी माझ्या आईला फोन केला आणि मी आईला रडत रडत सांगितलं की, "माझ्यासोबत असं झालंय... माझ्या आईनं मला सांगितलं घरी परत ये... मी पुढच्याच दिवशी ट्रेनच्या जनरल कोचची तिकीट काढली. ट्रेनचा जनरल कोच... मी बसलोय आणि मी रडत रडत घरी चाललोय. त्यावेळी घरी गेलेलो आणि स्वतःशीच म्हणत होतो की, मला या इंडस्ट्रीत यायचं नाही, इथं काम करणं अवघड आहे... मला इथे यायचंच नाही."
दरम्यान, अभिषेक कुमारनं 'उडारियां' शोमध्ये अमरीक सिंह विर्क आणि 'बेकाबू'मध्ये आदित्य रायचंद या भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांना फार आवडल्या. त्यानंतर तो 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झालेला. बिग बॉसच्या घरात ईशा मालवियासोबतच्या आपल्या भांडणामुळे तो चर्चेत आलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























