Womens Allegations On Actor Of Sexual Misconduct: प्रसिद्ध अभिनेत्यावर एक-दोन नव्हे तब्बल, 9 महिलांकडून लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; स्पष्टीकरण देताना अभिनेता म्हणाला...
Womens Allegations On Actor Of Sexual Misconduct: प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात एक, दोन नव्हे तर तब्बल नऊ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. यावर स्पष्टीकरण देताना अभिनेत्यानं मात्र सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Womens Allegations On Actor Of Sexual Misconduct: गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या वाईट कृत्याबाबत उघडपणे बोलत अन्यायाविरोधात आवाज उठवल्याचं आपण पाहिलंय. अभिनेत्रींनी सांगितलेले कास्टिंग काऊचचे भयावर किस्से अंगावर अगदी शहारे आणतात. असेच काहीसे आरोप एका प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात काही महिलांनी केले होते. प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात एक, दोन नव्हे तर तब्बल नऊ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. यावर स्पष्टीकरण देताना अभिनेत्यानं मात्र सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जेरेड लेटो (Jared Leto) याच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. नऊ महिलांचं म्हणणं आहे की, अभिनेत्यानं त्यांच्याशी अश्लील वर्तन केलं आहे. 'पीपल' मासिकातील एका वृत्तानुसार, "काही महिला असा दावा करतात की, ज्यावेळी अभिनेत्यानं त्यांचं लैंगिक शोषण केलं त्यावेळी त्या अल्पवयीन होत्या. अभिनेत्याकडून त्यांचा लैंगिक छळ बराच काळ चालू राहिला." 'एअर मेल'नं त्यांच्या अहवालात या महिलांच्या मुलाखती प्रकाशित केल्या. एका महिलेनं सांगितलं की, "प्रत्येकाला हे खूप दिवसांपासून माहीत होतं" जेरेड लेटोवर एका 16 वर्षांच्या मुलीला लैंगिक प्रश्न विचारण्याचा, 17 वर्षांच्या मुलीसमोर नग्न होऊन 18 वर्षांच्या मुलीला अयोग्य पद्धतीनं स्पर्ष केल्याचा आरोप आहे.
'पीपल' मासिकानं दिलेल्या वृत्तानुसार, 'एअर मेल' ला दिलेल्या निवेदनात, अभिनेता लेटोच्या प्रतिनिधीनं सर्वच्या सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, हे वृत्त खोटं असल्याचंही सांगितलं आहे. अहवालात समाविष्ट केलेल्या आरोपांमध्ये मॉडेल लॉरा ला रुचाही आरोप आहे. तिनं सांगितलं की, 2008 मध्ये, जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा ती अॅनिमल राईट्सच्या कार्यक्रमासाठी लेटोला भेटली होती. त्यांनी ईमेलद्वारेही बोलणं केलं. यानंतर, लेटोनं तिला तिच्या स्टुडिओमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं.
स्पष्टीकरण देताना अभिनेता काय म्हणाला?
लॉरा ला रुनं सांगितलं की, ती एप्रिल 2009 मध्ये लेटोच्या स्टुडिओमध्ये गेली होती, जिथे तिच्यासोबत छेडछाड झाल्याचा आरोप आहे. यावर लेटोच्या प्रतिनिधीनं 'एअर मेल'ला सांगितलं की, त्यांच्यातील संभाषणात काहीही चुकीचं किंवा अश्लील नव्हतं. नंतर स्वतः लॉरा ला रुनं लेटोची पर्सनल असिस्टंट होण्यासाठी अर्ज केला होता, ज्यावरून असं दिसून येतं की, त्यांच्यात काहीही अनुचित घडलं नव्हतं.
लॉरा ला रुनं लेटोची पर्सनल असिस्टंट होण्यासाठी अर्ज केला होता, या गोष्टीला तिनं स्पष्टपणे नकार दिला. तिनं 'एअर मेल'ला सांगितलं की, जेव्हा ती 17 वर्षांची होती, तेव्हा लेटो एकदा कपड्यांशिवाय तिच्यासमोर आला होता, जणू काही ही एक सामान्य गोष्ट होती. ती म्हणाली की, "त्या वेळी मला वाटलं की, कदाचित प्रौढ पुरुष असेच असतात."
दुसऱ्या एका महिलेनं दावा केला की, 2008 मध्ये लेटोनं लॉस एंजेलिसमधील एका कॅफेमध्ये तिच्याशी संपर्क साधला आणि तिचा फोन नंबर घेतला. त्यावेळी ती 16 वर्षांची होती. काही दिवसांनी लेटोनं तिला मध्यरात्री घरी बोलावलं. त्याचा आवाज इतका विचित्र होता की, लेटो दारू पिऊन आहे की, नाही हे समजणं अशक्य होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























