Samantha : फिटनेस फ्रिक समंथा करत होती 'या' आजाराचा सामना; सोडावा लागला होता चित्रपट
वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समंथा (Samantha) सोशल मीडियावर शेअर करते.
Samantha : पुष्पा द राइज या (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. समंथा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. पण ती एक आजाराचा समना करत होती.
रिपोर्टनुसार समंथाला 2013 मध्ये एका टेस्टमध्ये कळाले की तिला मधुमेह झाला आहे. समंथा आता बरी झाली आहे पण तिनं या आजारमुळे त्यावेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. समंथानं त्यावेळी 'मणिरत्नम' सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. समंथा सहा महिने अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली.
तसेच 2012 मध्ये समंथा पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन या स्किन संबंधित आजाराचा सामना करत होती. सूर्यप्रकाशात गेल्यानंतर त्रास होणे तसेच त्वचेची जळजळ होणे इत्यादी या आजाराची लक्षणं आहेत. एका मुलाखतीमध्ये समंथानं सांगितलं होतं की तिची इम्यूनिटी सिस्टम ही नाजूक आहे. त्यामुळे तिला इंफेक्शनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे समंथा तिच्या डाएटकडे आणि वर्क आऊट विशेष लक्ष देते. रिपोर्टनुसार समंथा फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश डाएटमध्ये करते.
View this post on Instagram
6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी समंथा आणि नाग चैतन्य यांचा त्यांचा घटस्फोट झाला.
संबंधित बातम्या
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला पती रितेशपासून विभक्त, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Gehraiyaa : दीपिकासोबतचा किसिंग सिन पाहिल्यानंतर सिद्धांतच्या काकांची भन्नाट रिअॅक्शन ; म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha