Salman Khan : किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'चं प्रमोशन करणार सलमान; काही दिवसांपूर्वी मिळालं होतं धमकीचं पत्र
जवळपास पन्नास दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर सलमाननं त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं.
Salman Khan : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. आता हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर जवळपास पन्नास दिवसांनी सलमान खान हा सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.
सलमान करणार विक्रांत रोणाच्या चित्रपटाचं प्रमोशन
सलमान हा मुंबईमध्ये विक्रांत रोणा या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँड या हॉटेसलमध्ये सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणार आहे. ताज लँड हे हॉटेल सलमानच्या घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर आहे. या इव्हेंटमध्ये मुंबई पोलीस आणि सलमानच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
आज (25 जुलै) विक्रांत रोणा चित्रपटाच्या प्रमोशनचा हा इव्हेंट होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कन्नड भाषेमध्ये करण्यात आली असून हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात किच्चा सुदीप आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. किच्चा सुदीप हा सलमानचा जवळचा मित्र आहे. सलमाननं त्याच्यासोबत दबंग-3 मध्ये काम केलं आहे. किच्चा सुदीपनं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. सलमाननं विक्रांत रोणा या चित्रपटाचं सोशल मीडियावर देखील प्रमोशन केलं.
23 जून रोजी विक्रांत रोणा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. या ट्रेलर लाँच इव्हेंटला सलमान खान उपस्थित राहणार होता पण सुरक्षेच्या कारणानं तो या कार्यक्रमाला हजर राहिला नाही. 26 जून रोजी मुंबई पोलिसांच्या उमंग या कार्यक्रमामध्ये सलमाननं हजेरी लावली होती. उमंग हा कार्यक्रम सहा ऑगस्ट रोजी सोनी टिव्हीवर रिलीज होणार आहे. सलमान खानला धमकीचं पत्र मिळून जवळपास 50 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर सलमाननं त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले.
हेही वाचा: