Siddharth Tweet For Saina nehwal : सिद्धार्थच्या ट्वीटवर सायना नेहवालच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले...
सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल (harvir singh nehwal) यांनी सिद्धार्थने केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.
Siddharth Tweet For Saina nehwal : प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालबद्दल (Saina Nehwal) ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने अभिनेता सिद्धार्थ (Siddharth ) सध्या चर्चेत आहे. राष्ट्रीय महिला आयोगने सिद्धार्थला (NCW) नोटीस पाठवली आहे. तसेच सायनाने देखील सिद्धार्थच्या ट्वीटला उत्तर देत नाराजी व्यक्त केली. आता सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल (harvir singh nehwal) यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
हरवीर सिंह नेहवाल यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'सिद्धार्थचे हे वागणे अत्यंत चुकीचे आहे. सायनाबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याबद्दल सिद्धार्थने माफी मागावी. '
Whatever he (actor Siddharth) said is very wrong. He used very wrong words against Saina (Nehwal). We condemn his statement. He should apologize for it, no matter if he made these remarks intentionally or unintentionally: Saina's father Harvir Singh Nehwal to ANI
— ANI (@ANI) January 10, 2022
(File photo) pic.twitter.com/jGCH3EMSYf
सायनाने दिली प्रतिक्रिया
सायना नेहवालने सिद्धार्थच्या ट्वीटला उत्तर देत नाराजी व्यक्त केली आहे. सायना म्हणाली, "मला माहीत नाही त्याला काय म्हणायचयं. मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण हे त्याने योग्य केलेलं नाही. तो अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करू शकला असता. पण हे ट्विटर आहे. ट्विटरवर आक्षेपार्ह शब्दांची दखल घेतली जाते". सायनाचे पती पारुपल्ली कश्यप यांनीदेखील सिद्धार्थच्या आक्षेपार्ह ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. पारुपल्ली ट्वीट करत म्हणाले,"तुमची मतं व्यक्त करा..पण चांगल्या शब्दांत".
काय आहे प्रकरण
पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणाबद्दल सायना नेहवालने ट्वीट केले होते. सायनाच्या ट्वीटवर भाष्य करत सिद्धार्थने त्याचे मत मांडले. सिद्धार्थने या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेक जण ट्रोल करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्वीटमध्ये 'शेम ऑन यू रिहाना' असंही लिहिले होते. सिद्धार्थने ट्वीटमध्ये वापरलेल्या शब्दाचा निषेध करत महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे.
संबंधित बातम्या
Tejas Barve and Amruta Dhongade : ‘मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha