एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे.

Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) याच्यावर मध्यरात्री 2.30 (16 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे.  घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. 

महिला मदतनीसानेच आरोपीला दिली घरात एन्ट्री- (Reason behind the attack on Saif Ali Khan)

पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला. 

सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार-

अज्ञात व्यक्ती मुख्य दरवाजाच्याशेजारी असलेल्या पहिल्या रुममधून घरात शिरला. या अज्ञात व्यक्तीला सर्वातप्रथम घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला. यामुळे मोलकरणीने आरडाओरडा सुरु केला. मोलकरणीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

संबंधित बातमी:

Saif Ali Khan Attack: पहिला वार मोलकरणीच्या हातावर; सैफ अली खानने पाहताच मदतीला धावला, दोघांमध्ये झटापट अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 : 12 Noon100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 11 AMOpposition Leader News | विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार? कोण होणरा विरोधी पक्ष नेता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
Embed widget