एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack: पहिला वार मोलकरणीच्या हातावर; सैफ अली खानने पाहताच मदतीला धावला, दोघांमध्ये झटापट अन्...

Saif Ali Khan Attack: अज्ञात व्यक्ती ज्यावेळी सैफ अली खानच्या घरात शिरल्याचे सुरुवातील काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले.

Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) याच्यावर चाकू हल्ला झाला. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर वार केले. सध्या सैफ अली खानची तब्येत ठीक असून लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर घटनेनं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. 

अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरल्याचे सुरुवातीला काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. अज्ञात व्यक्तीने सुरुवातील मोलकरणीच्या हातावर चाकून वार केले. यानंतर मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान बाहेर आला. सैफ अली खानने अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकून आणि मोलकरणीचा हात रक्ताने माखल्याचे पाहून तो तिच्या मदतीसाठी धावला. यावेळी आरोपी आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाली. त्यावेळी आरोपीने हातातील चाकूने सैफवर सहा वार करत पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सैफ अली खानवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया-

सैफ अली खानवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आलेत. या हल्ल्यामध्ये त्याला 10 सेंटीमीटरची  जखम झाली. अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानच्या हात आणि पाठीवरही वार करण्यात आले. पाठीत धारदार शस्त्र खुपसलं असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केलीय. 

सैफ अली खानच्या टीमने जारी केले निवेदन-

सैफ अली खानच्या टीमने या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. सैफ अली खानच्या टीमने निवेदनात म्हटलं की, सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस चैकशी करत आहेत. आम्ही सदर प्रकरणाबाबत लवकरच सविस्तर माहिती देऊ, असं सैफ अली खानच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. 

पत्नी करिना कपूर खान आणि मुले सुरक्षित-

सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर आणि मुलं सुरक्षित आहेत. या घटनेवर कुटुंबाने अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सदर घटनेनंतर चोर अद्याप फरार आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक चोराच्या शोधात आहे. सैफ अली खानच्या घराभोवती असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

संबंधित बातमी:

Saif Ali Khan Injured: सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम, हातावर 10 वार, पाठीत धारदार शस्त्रही खुपसलं; मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?

सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Bigg Boss Marathi Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget