एक्स्प्लोर

Super Duperr Trailer Released: एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released

Super Duperr Trailer Released: नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे.

Super Duperr Trailer Released: यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या 'सुपर डूपर' (Super Duperr Movie) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून यात एकमेकांवर कुरघोडी करणारे एकाहून एक मातब्बर कलाकार बघून हा चित्रपट पैसा वसूल करणारा ठरेल  अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. झी स्टुडिओज (Zee Studios) प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या 3 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

सिनेमाची कथा नेमकी काय? (Marathi Movie Super Duperr)

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे  कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या सगळ्या गोंधळात 'झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच' हा निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला भावस्पर्शी संवादही ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो. विनोद, नात्यांमधली ऊब आणि भावनिक क्षण यांचा सुंदर मेळ यात दिसून येतो. 

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. निर्मिती सावंत (Nirrmite Saawaant), शशांक शेंडे, हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), कुशल बद्रिके (Kushal Badrike), प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

या ट्रेलर लाँच प्रसंगी दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, "सुपर डुपर' हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर नात्यांमधल्या गंमतीजमती आणि त्यामागची भावनिक बाजू दाखवणारा प्रवास आहे. दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची कुटुंबं एकाच घरात राहायला लागली की, किती गंमतीशीर प्रसंग घडू शकतात, हे आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलं आहे. ट्रेलरमधून त्याची फक्त झलक पाहायला मिळते. परंतु चित्रपटात प्रेक्षकांना हास्य, गोंधळ आणि नात्यांची ऊब असा सगळाच अनुभव मिळेल, असा आमचा विश्वास आहे..."

झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, "प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशीच मेजवानी देणारा हा चित्रपट आहे. एकाहून एक मातब्बर कलाकार यात बघायला मिळणार असून प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच , त्यांना भावनिक करणारा आणि प्रसंगी अंतर्मुखही करणारा हा चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबाने चित्रपटगृहात एकत्र येऊनच अनुभवावा असा हा चित्रपट झाला आहे.  यामुळेच, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वांना एक खास कौटुंबिक महासोहळा अनुभवायला मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे..."

3 एप्रिलपासून 'सुपर डुपर' प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक धमाल कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

पाहा व्हिडीओ : 'सुपर डुपर'चा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget