Sai Tamhankar : 'हाच मेसेज तुझ्या आई-बापाला पाठव', जेव्हा सईला compromise करायला सांगितलं..., अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव
Sai Tamhankar : सिनेसृष्टीत काम करताना अभिनेत्रींना अनेकदा कास्टिंग काऊचचे अनुभव येत असतात. असाच एक अनुभव अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील सांगितला आहे.
Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) बॉलीवूडमध्येही तिचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक सिनेमा आणि मालिकांमधून सईने प्रेक्षकांची मनं जिकंली. त्यामुळे सईचा चाहतावर्गही तसा मोठा आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्री देखील सुरुवातीच्या काळामध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.
अनेक सिनेमांमध्ये सईने बेधडक भूमिका केल्या आहेत. तशीच ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील आहे. सई कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी दिलाखुलासपणे बोलत असते. नुकतच तिने हॉटरफ्लाय या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
सईला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
सईने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत म्हटलं की, माझ्या करिअरच्या खूप सुरुवातीला मला हा अनुभव आला आहे. मला एक भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी मला सांगितलं की, असा रोल आहे वैगरे..., पण त्यासाठी तुला काही लोकांसोबत कॉप्रमाईज करावं लागलं. असा मेसेज मला त्या संबंधित व्यक्तीने केला. त्याच्या त्या मेसेजला रिप्लाय करत मी त्याला म्हटलं की, हाच मेसेज तू तुझ्या आईला आणि वडिलांना पाठव आणि पुन्हा मला कधीच मेसेज किंवा फोन करु नकोस.
पुढे तिने म्हटलं की, मला माझ्या आयुष्यात असा अनुभव एकदाच आला आहे. या 15 ते 20 वर्षात माझ्यासोबत हे असं एकदाच घडलं आङे. पण या गोष्टींची शाहनिशा करणं देखील खूप कठिण आहे. मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे? त्याच्या फोनवरुनच त्याने खरंच असा मेसेज केलाय का? हेसुद्धा आपल्याला माहित नसतं.
सईचा सिनेप्रवास...
सईने मालिकांमधून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. तिने तुझ्याविना, या गोजिरवाण्या घरात, कस्तुरी या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर तिने आमिर खानच्या गजनी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने सनई चौघडे, क्लासमेट्स, दुनियादारी, नो एन्ट्री, प्यारवाली लव्हस्टोरी, तु ही रे अशा सिनेमांमधून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर तिने हंटर, भक्षक, मिमी यांसारख्या बॉलीवूड सिनेमांमध्येही काम केलं. तसेच आता सईने तिच्या नव्या व्यावसायाची देखील सुरुवात केली आहे.
ही बातमी वाचा :
Kiran Mane : किरण मानेंचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, या मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका