Kiran Mane : किरण मानेंचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, या मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका
Kiran Mane : किरण माने हे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असून ते मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

Kiran Mane : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असेलेले किरण माने (Kiran Mane) आता छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहेत. किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांच्या करिअरलाही थोडा ब्रेक लागल्याचं चित्र होतं. पण बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली. आता ते सन मराठी वाहिनीवरील तिकळी या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेत किरण माने खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.
पहिल्या झलकपासून ते आतापर्यंत हळू-हळू एक पैलू, पात्रं उलगडणारी ‘सन मराठी’ची ‘तिकळी’ या मालिकेतील रहस्य काय, नेमका कशाचा उलगडा या मालिकेतून होणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. ही मालिका येत्या 1 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोंमधून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, अभिनेता पार्थ घाटगे या मालिकेत विशेष भूमिका साकारणार आहेत हे प्रेक्षकांना कळलं आहे. पण संपूर्णच गोष्ट रहस्याने भरलेली असताना एक पण नकारात्मक पात्रं नसणार हे कदापि शक्य नाही. मालिका सुरु झाल्यावर हळू-हळू जसं रहस्य उलगडत जाईल तसंच मालिका प्रदर्शित होईपर्यंत या मालिकेत अजून कोण कलाकार आहेत याचा ही उलगडा ‘सन मराठी’ करत राहील.
किरण माने साकारणार भूमिका
सध्या ज्या व्यक्तीचा सगळीकडे आवाज आहे आणि ‘तिकळी’ मालिकेच्या विषयासारखाच त्या व्यक्तीचा विषय देखील गंभीर आहे असा कलाकार या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेते किरण माने हे आहेत. किरण माने ‘तिकळी’मध्ये ‘बाबाराव’ हे पात्रं साकारणार आहेत. बाबाराव हा गावचा खोत ज्याचा गावावर वचक आहे. बाबारावचा शब्द हा शेवटचा शब्द असा रुबाब घेऊन बाबाराव गावात राहतोय. पण बाबाराव आणि तिकळी यांचा नेमका संबंध काय किंवा त्यांचं समीकरण नेमकं कुठे जुळतंय हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळेल.
किरण माने हे अभिनयासोबतच आता राजकारणात देखील सक्रिय आहेत. किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून ते लोकसभेच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाचे स्टार प्रचारक देखील होते. तसेच सध्याच्या अनेक घडामोडींवर किरण माने हे त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. त्यामुळे सोशल मीडियावरही ते कायमच चर्चेचा विषय ठरतात.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
RSS Chief Mohan Bhagwat : संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि मुकेश अंबानी यांची भेट, नेमकं कारण काय?























