Sai Tamhankar : 'होय आम्ही वेगळे झालोय,' सई ताम्हणकर आणि अनिश जोगचं ब्रेकअप, अभिनेत्रीनेच दिली कबुली
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याचं कबुल केलं आहे.
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सईने तिच्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमुळे सईच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. सई ताम्हणकर अनेक महिन्यांपासून निर्माता अनिश जोगला (Anish Jog) डेट करत होती. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याच स्वत: सईने कबुल केलं आहे.
सईने नुकतीच हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सईने तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. सईने तिच्या सोशल मीडियावर काही केलेल्या पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या पोस्टमध्ये सईने म्हटलं होतं की, मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही पण आता ही माझी निवड आहे. त्यावर तिने #Truestroy असंही हॅशटॅग दिलं होतं. पण आता ब्रेकअप झाल्याचं सईने मान्य केलं आहे.
सईने काय म्हटलं?
सईने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'होय आम्ही वेगळे झाले आहोत आणि हा आमचा एकत्रित निर्णय आहे. हा निर्णय घेणं कठीण होतं पण आता जे आहे ते आहे. तो माझ्या आयुष्यात नेहमीच खूप खास व्यक्ती म्हणून राहिल. मी कायमच त्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना करेन आणि मला खात्री आहे त्यालाही असंच वाटत असणार..'
दरम्यान सई आणि अनिश हे काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक समीर विद्वंस याच्या लग्नामध्ये एकत्र दिसले होते. इतकच नव्हे तर त्यांनी एकाच रंगाचे कपडेही परिधान केले आहेत. या लग्नात सईने नारंगी रंगाची साडी आणि अनिशने नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. पण तरीही आता अनिश आणि सई वेगळे झाले आहेत.
सई ताम्हणकरविषयी...
ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. मराठी मनोरंजनसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला खऱ्या अर्थाना लोकप्रियता मिळाली. आजवर सईने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दरम्यान सईने अमेय गोसावीसोबत लग्नगाठही बांधली होती. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही आणि सईचा घटस्फोट झाला.