Neha Kakkar-Rohanpreet Divorce : नेहा कक्कर घटस्फोट घेणार? नवऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, 'त्याच गोष्टी...'
Neha Kakkar-Rohanpreet Divorce Rumors: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
Neha Kakkar-Rohanpreet Divorce Rumors: नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) यांचा 2020 मध्ये आनंद कारजमध्ये लग्न झालं होतं. या दोघांनीही दिल्लीत लग्नगाठ बांधली होती. नुकतीच यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. नेहा आणि तिचा नवरा घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
यावर आता नेहाच्या नवऱ्याची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. इन्स्टंट बॉलीवुडला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, अफवा फक्त अफवा आहेत, त्या खऱ्या नाहीत, त्या फक्त घडलेल्या गोष्टी आहेत. उद्या कोणी काही बोलेल, परवा कोणी काही बोलेल, पण त्याचा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम होऊ देऊ नये.
'आमचं जे आयुष्य सुरु आहे...'
रोहनप्रीतने पुढे म्हटलं की, 'मला वाटतं की तुम्ही अशा गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्याव्यात. हे लोकांचं काम आहे, त्यांना ते करण्यात मज्जा येते. आपण जे काही जीवन जगत आहोत ते आपण आपल्या मनाप्रमाणे जगतो.
अनेक दिवसांपासून नेहाच्या घटस्फोटाच्या चर्चा
अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या की, नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंह यांच्यात वाद सुरु आहे. अशा परिस्थितीत हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होतया मात्र रोहनप्रीतने तिच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक आहे आणि घटस्फोटाच्या बातम्या केवळ अफवा असून त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
View this post on Instagram