Arbaz Patel : बिग बॉसच्या घरात महाराजांचा जयजयकार न केल्याप्रकरणी अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी धर्माबाबत...'
Arbaz Patel : बिग बॉसच्या घरात शिवाजी महाराजांचा जयजयकार केला नाही त्यामुळे अरबाज पटेलला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.
Arbaz Patel : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi New Season) हा खेळ सुरु होऊन आता जवळपास 57 दिवस झाले आहेत. या घरातून एक एक स्पर्धक कमी होत गेला आणि स्पर्धा अधिकच रंजक होत गेली. नुकतच या घरातून अरबाज पटेल हा बाहेर पडला आहे. अरबाजविषयी (Arbaz Patel) प्रेक्षकांची फार नाराजी होती. त्याचा खेळही प्रेक्षकांना फारसा आवडत नव्हता. पण आता घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाजने घरातील वेगवेगळ्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
घरातून पुरुषोत्तम दादा पाटील हे पहिल्यांदा बाहेर पडले. पण ते जेव्हा घरातून बाहेर पडत होते, त्यावेळी एका गोष्टीमुळे अरबाजला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. पुरुषोत्तम दादांनी घरातून बाहेर पडताना महाराजांचा जयजयकार केला होता. त्यावेळी अरबाजने तो जयजयकार केला नाही, म्हणून त्याला ट्रोल केलं जात होतं. त्यावर अरबाजने नुकतच सकाळ मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
अरबाजने काय म्हटलं?
अरबाजने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'खरं सांगू तर मला याची कल्पनाच नाही की असं काही तिथे घडलं आहे. मी संभाजीनगरमध्ये राहतो आणि सगळ्यांना माहितेय की, ती एक ऐतिहासिक जागा आहे. आज आपण शिवाजी महाराजांमुळेच इथे आहोत.. त्याक्षणी कदाचित मी काहीतरी विचार करत असेन कारण मीच पुरुषोत्तम दादांना नॉमिनेट केलं होतं. त्यांची आम्ही खूप काळजी घेतली होती. त्यामुळे माझ्या मनात असं काही नव्हतं.'
पुढे त्याने म्हटलं की, जर मी धर्मिकदृष्ट्या विचार करत असेन तर मी बिग बॉस मराठीमध्ये आलोच नसतो. मी म्हटलं असतं की, मी मराठी बिग बॉसमध्ये जाणार नाही. त्याच्यानंतरही तुम्हाला असं काही दिसलं का? त्याक्षणीही असं काही झालं नव्हतं... मी त्यावेळी कोणत्यातरी विचारात होतो. मी तसा व्यक्ती नाही.. मी धर्माबाबत खूप संवेदनशील आहे. पण जरी कुणाला असं काही वाटलं असेल तर मी त्या सगळ्यांची माफी मागतो.
ही बातमी वाचा :
Prajkta Mali : 'मदनमंजिरी'च्या मोहक अदा, फुलवंतीचं नवं गाणं; प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज