Rang Majha Vegla : अखेर दीपिकाला सत्य कळणार! दीपा आपली पत्नी असल्याचं कार्तिक स्वतः सांगणार?
Rang Majha Vegla : सध्या मालिकेत दीपिका तिच्या आईला शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. आता लवकरच तिला तिची आई कोण हे कळणार आहे.
Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडते आहे. या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी यांचा आई-वडील मिळवण्यासाठी चाललेला संघर्ष प्रेक्षकांना मालिकेकडे खेचत आहे. सध्या मालिकेत दीपिका तिच्या आईला शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. आता लवकरच तिला तिची आई कोण हे कळणार आहे. नुकताच त्यांच्या शाळेत एक कार्यक्रम पार पडला. ज्यात दीपिका आणि कार्तिकीसह कार्तिक आणि दीपाने देखील भाग घेतला होता. आता स्वतः कार्तिक दीपिकाला तिच्या आईचा फोटो दाखवणार आहे.
दीपिका आणि कार्तिकीच्या शाळेत नुकतेच एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकांत बाहेरचे कलाकार बोलवण्याऐवजी मुलांना आणि त्यांचा पालकांना सहभाग घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी त्यांची टीम बनवून, त्यात कार्तिक आणि दीपाला सामील व्हायला लावतात. या दरम्यान आता ते दोघे एकमेकांजवळ आले आहेत.
कार्तिक दीपिकाला दाखवणार आईचा फोटो!
नुकत्याच आलेल्या एका प्रोमोत दाखवण्यात आले आहे की, दीपिका कार्तिकला विचारते, ‘माझी आई कुठे आहे? ती माझ्याकडे कधी येणार? ती मला का सोडून गेली?’ यावर उत्तर देताना कार्तिक तिला म्हणतो की, ‘तुला तुझी आई बघायची आहे ना?’ असं बोलून एक फोटो खिशातून बाहेर काढतो आणि म्हणतो, ‘ही बघ ही आहे तुझी आई.’ इतक्यात मागून सौंदर्या आणि दीपा येते. तेव्हा, दीपाकडे पाहून दीपिका ‘आई’ म्हणते. यावेळी तिच्या हातात नेमका कोणाचा फोटो आहे, हे समोर आलेले नाही. मात्र, हा फोटो खरंच दीपाचा असावा, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. तर, हा फोटो आयेशाचा असल्याचा काही प्रेक्षक म्हणत आहेत. आता कार्तिकने दीपिकाला दिलेला हा फोटो नेमका कुणाचा आहे, हे लवकरच कळणार आहे.
हेही वाचा :
Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...
PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!