Rana Daggubati Alcohol Brand Alcobev: राण दग्गुबत्तीचा अल्कोहोल ब्रँड ठरतोय सुपरहिट; 750 ml बाटलीची किंमत माहितीय?
Rana Daggubati Alcohol Brand Alcobev: राण दग्गुबत्तीनं नवा बिझनेस ब्रँड सुरू केलाय, अल्कोहोलचा. 750 ml बाटलीची किंमत माहितीय का?

Rana Daggubati Alcohol Brand Alcobev: हिंदी (Hindi Movie) आणि साऊथ फिल्म (South Films) इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटी आहेत, जे सिनेमात अभिनय करण्याव्यतिरिक्त स्वतःचे व्यवसाय देखील चालवतात आणि त्यातून धुवांधार कमाई करतात. तसेच, ते विविध क्षेत्रांत गुंतवणूक देखील करतात. इतकंच नाहीतर, अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचे वेगवेगळे ब्रँड्स सुरू केले आहेत. यामध्ये अनेक सुपरस्टार सेलिब्रिटी आहेत. सुनिल शेट्टी (Suniel Shetty), सलमान खान (Salman Khan) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आपापले ब्रँड्स सुरू केले आहेत. यापैकी एक साऊथ सुपरस्टारही (South Superstar) आहे, ज्यानं स्वचःचा ब्रँड सुरू केलाय. साऊथ सुपरस्टार राणा दग्गुबत्ती (Rana Daggubati) यानं एक अल्कोहोल ब्रँड (Alcohol Brand) सुरू केलाय.
गेल्या काही वर्षांत, राणानं आपला बिझनेस वाढवला आहे आणि कॉफी, गेमिंग आणि रेस्टॉरंट्स सारख्या विविध बिझनेसमध्ये एन्ट्री केली आहे. गेल्या वर्षी, त्यानं त्याचा नवा अल्कोबेव्ह (AlcoBev) ब्रँड देखील लाँच केलाय.
750ml टकीलाची किंमत किती?
राणा दग्गुबत्ती संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत ब्रँडचा को-फाउंडर आहे. जरी हा ब्रँड अद्याप भारतात पूर्णपणे झालेला नसला तरी, भारतीय ड्युटी-फ्री दुकानांमध्ये या ब्रँडच्या 750 ml टकीलाची किंमत सुमारे 750 ml रुपये आहे. 5 हजार रुपये ते 7 हजार रुपयांपर्यंत आहे. राणा आणि अनिरुद्धच्या टकीला ब्रांड 'लोका लोका' हे नाव स्पॅनिश आणि संस्कृतच्या एकत्रिकरणातून तयार करण्यात आली आहे. त्यांच्या वेबसाईटनुसार, स्पॅनिशमध्ये लोकाचा अर्थ क्रेजी असा होतो आणि संस्कृतमध्ये लोकाचा अर्थ जग असा होतो.
2024 मध्ये अमेरिकेत या ब्रँडचं अधिकृत लाँचिंग झाल्यानंतर सिंगापूरमध्ये दोन दिवसांचा कार्यक्रम झाला. या ब्रँडचे तिसरे को-फाउंडर हर्षा वडलामुडी देखील आहेत आणि ही तिसऱ्या पिढीतील टकीला निर्माता विली बानुएलोस यांनी बनवली आहे. ज्यांनी द हिंदूला सांगितलं की, ते डिस्टिलरीत पाश्चात्य क्लासिकल म्युझिक वाजवतात आणि फर्मेटेशन प्रोसेसवर परिणाम करतात.
"फ्लेवरमध्ये लेयर्डमधले बारकावे जोडण्यासाठी म्युझिकचा वापर..."
यावर संगीतकार अनिरुद्ध म्हणाला की, "फ्लेवरमध्ये लेयर्डमधले बारकावे जोडण्यासाठी म्युझिकचा वापर करणं पूर्णपणे सरप्राईज होतं. यामुळे मला आमच्या पुढच्या रेंजसाठी खूपसाऱ्या आयडिया मिळाल्यात..." हा अनिरुद्धचा पहिला एंटरप्रेन्योरियल वेंचर होता आणि त्यानं हेसुद्धा मान्य केलंय की, यामध्ये पाऊल ठेवलं की, म्युझिक आणि दारू... एकत्रच चालतात.
त्यांनी पब्लिकेशनला सांगितलंय की, "म्युझिक आणि दारू नॅचरली एकत्र चालतात आणि मी पाहिलंय की, माझ्या सोशल सर्कलमध्ये टकीलाची पॉपुलॅरिटी कशी वाढतेय... यामुळे लोका लोका माझ्यासाठी एक परफेक्ट एंटरप्रेन्योरियल सुरुवात होती."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























