Hardik Pandya Mahieka Sharma: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..., आधी जोड्यानं पूजा केली, मग जिममध्ये हार्दिंक पांड्यानं गर्लफ्रेंडला थेट कडेवर घेतलं
Hardik Pandya Mahieka Sharma: हार्दिक पांड्याची पहिली पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक आणि माहिकामधली जवळीक वाढली. हार्दिक आणि नताशाचं लग्न चार वर्ष टिकलं आणि दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे.

Hardik Pandya Mahieka Sharma: टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री माहिका शर्मा (Mahieka Sharma) सध्या सोशल मीडियावर (Social Media) भलतेच चर्चेत आहेत. आधी दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगलेल्या, पण काहीच दिवसांत दोघे एकत्र फिरताना दिसू लागले. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. अशातच आता हार्दिक पांड्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आयुष्यातील 'बिग 3' फोटो शेअर केले आहेत. त्यात माहिका, त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा पाळीव कुत्रा दिसतोय. या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलंय यामध्ये हार्दिक पांड्या माहिकासोबत कोझी होताना दिसतोय. तसेच, फोटो पाहून हार्दिकचं लग्न तर झालेलं नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
हार्दिक, माहिकाच्या साखरपुड्याच्या अफवा
यापैकी एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलंय, ज्यामुळे साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे. फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका एकत्र प्रार्थना करताना दिसत आहेत आणि माहिकाच्या बोटावर चमकदार हिऱ्याची अंगठी दिसतेय. दोघांनी गुपचूप आपलं नातं एक पाऊल पुढे नेलंय की काय? असा प्रश्न सध्या सर्वांना पडलाय. इतर फोटोंमध्ये, हे जोडपं पारंपारिक भारतीय पोशाखात सजलेलं दिसतंय. एका फोटोमध्ये, हार्दिक माहिकाच्या गालावर किस करताना दिसतोय आणि त्यासोबतच ते एका पूजेमध्येही सहभागी होताना दिसले. दरम्यान, या जोडप्यानं अद्याप या अफवांवर कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
इथे फोटो पाहा...
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या रिअॅक्शन्स
दुसऱ्या एका फोटोमध्ये दोघे एकत्र दिसतायत आणि या फोटोमध्ये माहिकाच्या हातात एक मोठी सॉलिटेअर रिंग दिसतेय. या फोटोंमुळे अफवा पसरल्या की, दोघांनी गुपचूक साखरपुडा उरकून टाकलाय. एका युजरनं लिहिलंय की, "असं दिसतंय की दोघे लवकरच लग्न करणार आहेत, त्यांचा साखरपुडा झाला आहे." दुसऱ्यानं लिहिलंय की, "भावानं गुपचूप साखरपुडा केलाय..." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "हार्दिक भाऊ पुन्हा प्रेमात पडलाय आणि साखरपुडा झालाय. आता दोघे एकत्र संसार थाटतील..."
माहिका अन् हार्दिकच्या नात्याची सुरुवात कशी झाली?
हार्दिक पांड्याची पहिली पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक आणि माहिकामधली जवळीक वाढली. हार्दिक आणि नताशाचं लग्न चार वर्ष टिकलं आणि दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. दोघांनी 2023 मध्ये पुन्हा लग्न केलेलं, पण त्यानंतर एकाच वर्षात 2024 मध्ये दोघांनी आपसी सहमतीन वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव अभिनेत्री आणि गायिका जास्मिन वालियाशी जोडलं गेलेलं. पण, त्या अफवा असल्याचं सर्वांना कळंलं जेव्हा, हार्दिकनं माहिकासोबतच्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो शेअर करून आपलं नातं सार्वजनिक केलं तेव्हा. दोघांनी बीचवरील व्हेकेशनचे फोटो शेअर केलेले. याआधी, 10 ऑक्टोबर रोजी हार्दिक आणि माहिका मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते, ज्यामुळे कपल म्हणून पहिल्यांदा दोघे सार्वजनिकरित्या एकत्र दिसले.
माहिका शर्मा नेमकी आहे तरी कोण?
माहिका शर्मा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेसशी संबंधित कंटेंट देखील पोस्ट करते. तिनं फ्रीलांसर म्हणून सुरुवात केली आणि रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये ती दिसली. तिनं ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी डायरेक्टर ऑरलँडो वॉन आइन्सीडेल यांच्या 'इनटू द डस्क' आणि ओमंग कुमार यांच्या 'पीएम नरेंद्र मोदी' (2019) मध्ये विवेक ओबेरॉयसोबत छोट्या भूमिका केल्या आहेत. 24 वर्षीय या तरुणीनं अनेक जाहिरातींमध्ये काम केलंय. अनिता डोंगरे, रितू कुमार, तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल सारख्या प्रमुख भारतीय डिझायनर्ससाठी मॉडेलिंग केलंय. ती एक सर्टिफाइड लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहे आणि तिनं एक अॅडव्हान्स योगा इंस्ट्रक्टर म्हणून देखील प्रशिक्षण घेतलंय.























