Deepika Padukone : मॅटरनिटी ब्रेकनंतर दीपिका पदुकोण दमदार कमबॅक करणार, बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी छापण्याचा फुल प्रूफ प्लॅन
Deepika Padukone Back to Work : अभिनेत्री दीपिका पदुकोण मॅटरनिटी ब्रेकनंतर लवकरच सेटवर परतणार आहे. 1000 कोटींच्या चित्रपटातून ती बॉक्स ऑफिसवर परतणार आहे.
Deepika Padukone Comeback : सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. दीपिका लवकरच कामावर परतणार आहे. दीपिका पदुकोण लवकरच सेटवर परतणार असून शुटींगला सुरुवात करणार आहे. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाने कामातून ब्रेक घेतला होता, सध्या ती लेक दुआचं संगोपन करण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता ती लवकरच शुटींगला परतणार आहे. दीपिका पदुकोण दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांमध्ये ती सेटवर परतून चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. दीपिका पदुकोण आता लवकरच बॉक्स ऑफिसवर घरवापसी करणार आहे.
मॅटरनिटी ब्रेकनंतर दीपिका करणार दमदार कमबॅक
अभिनेत्री दीपिका पदुकोण शेवटची सिंघम रिटर्न्स चित्रपटात झळकली होती. मात्र, मुलीच्या जन्मानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. यामुळे ती सिंघम रिटर्न्स चित्रपटाच्या प्रमोशनलाही गैरहजर होती. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकर कल्की एडी 2898 पार्ट 2 च्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. 2024 मध्ये रिलीज झालेला कल्की एडी 2898 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शुटींगला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
दीपिकाचा कल्की AD 2898 पार्ट 2 मधील लूक
सध्या दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोण कल्की 2898 पार्ट 2 च्या लूकमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कल्कीच्या निर्मात्यांनी लिहिलं आहे, "लवकरच भेटू..." यामुळे दीपिका पदुकोणला पुन्हा मोठ्या पडद्यावर चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दीपिका पदुकोण पुन्हा एकदा कामाकडे वळणार असल्याची अपडेट मिळताच तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. दीपिका पदुकोणचे चाहते बऱ्याच दिवसांपासून मिस करत होते. आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण गायबच झाली होती.
बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी छापण्याचा फुल प्रूफ प्लॅन
दीपिका पदुकोणने काही दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला. याशिवाय दीपिका पदुकोण दलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. कधी कधी दीपिका पदुकोणही तिच्या मुलीसोबत स्पॉट होते. दीपिका पदुकोण सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे, त्यामुळे दीपिका पदुकोणला आतापर्यंत कामासाठी वेळ मिळाला नव्हता. मात्र, आता दीपिका पदुकोणने तिच्या करियरवर लक्षल केंद्रित करताना दिसेल.
सेटवरील दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :