(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bade Miyan Chote Miyan : अखेर गुढ उमजलं! 'हा' आहे 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमातील मास्क मॅन, 700 कोटींच्या सुपरहिट चित्रपटात झळकला होता अभिनेता
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेला बडे मिया छोटे मिया हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्कंठा बरीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधून या चित्रपटातील कलाकारांबद्दल स्पष्ट होत होतं. पण या ट्रेलरमधील मास्क मॅनची (Mask Man) उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, अलाया एफ आणि जुगल हंसराज दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडल्याचं पाहायला मिळालं आहे. रिलीजच्या अवघ्या 2 दिवसांत या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
कोण आहे मास्क मॅन?
या हाय-ऑक्टेन ॲक्शन-पॅक ट्रेलरमध्ये एक आवाज एकू येत आहे. पण ज्याचा चेहरा कोणालाच दिसत नाही. कारण या व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे. त्यामुळे हा मास्क मॅन कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. हा मास्क मॅन हा एक सुपरस्टार आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलाय हा अभिनेता
साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पृथ्वीराज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन मास्क मॅनच्या भूमिकेत झळकणार असून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना वेगवेगळी आव्हाने देताना दिसणार आहे. तसेच तो बॉलीवूडचा हिट चित्रपट सालार या चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई केली होती.