एक्स्प्लोर

Aashay Kulkarni : 'माझा होशील ना' फेम अभिनेत्याचं छोट्या पडद्यावर कमबॅक, स्टार प्रवाहवरील मालिकेत केली एन्ट्री, झळकणार 'या' भूमिकेत

Aashay Kulkarni : अभिनेता आशय कुलकर्णी याने स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा या मालिकेत एन्ट्री केली आहे. दरम्यान आशय हा कोणत्या भूमिकेत झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Aashay Kulkarni :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'माझा होशील ना' (Majha Hoshil Naa) या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा (Murambaa) या मालिकेत आशय झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमधून आशयची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सध्या मुरांबा ही मालिका रंजक वळणावर आहे. अक्षय आणि रमाच्या नात्यामध्ये रेवा नावाचं वादळ उभं आहे. पण आता रेवाचं एक मोठं सत्य आशय आल्याने बाहेर पडणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

वाहिनीकडून मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये आशय कुलकर्णी हा रेवाच्या आधीच्या प्रियकर असल्याचं समोर येतं. नेहमी काही तरी कारण खोटं बोलणाऱ्या रेवाचं आणखी एक सत्य बाहेर येणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे आता आशयच्या येण्याने मालिकेत मालिकेला कोणतं नवं रंजक वळण मिळणार याची वाट प्रेक्षक पाहतायत. 

मालिकेच्या प्रोमोमध्ये काय? 

धुळवडीच्या निमित्ताने मुकादमांच्या घरी उत्साहाचं वातावरण असतं. रंगाच्या रंगात न्हाऊन गेलेल्या मुकादमांसह रेवाच्या आयु्ष्यात आणखी एक नवा रंग येणार आहे. याचवेळी आशयची एन्ट्री होते. तो रेवाला म्हणतो की तू माझ्यापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न कर मी तुझ्या कायमच जवळ आहे. त्यावेळी रेवाच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडतो. 

रेवाचं खरं रुप मुकादमांच्या समोर येणार? 

रेवाचं अक्षयवर प्रेम असल्याचं म्हणत ती मुकादमांच्या घरी राहत असते. अक्षय रेवाला प्रतिसाद देत नसल्याचं आता रेवा अभिषेकला देखील नादाला लावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अक्षय आणि रमाच्या नात्याला लागलेलं रेवा नावाचं ग्रहण आता आशयच्या एन्ट्रीने दूर होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान या मालिकेत आशय अर्थव हे पात्र साकारणार आहे. 

आशयच्या कामाविषयी 

आशय हा काहीदिवसांपूर्वी आलेल्या व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील  ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम केलं आहे. त्याप्रमाणे आशय हा  ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by team muramba💕 (@team.muramba)

 

ही बातमी वाचा : 

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीकडून कंगनाचं अभिनंदन, 'विजयभव:' म्हणत शेअर केली पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget