(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Celebrities : ही खरी फायनल..., टीम इंडियाच्या यशावर मराठी कलाकारांचा आनंद, अभिमानास्पद क्षणाचं साऱ्यांनी केलं कौतुक
Marathi Celebrities : भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. यावर मराठी कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Marathi Celebrities : शनिवार 29 जून रोजीचा दिवस हा भारतीयसांठी सगळ्यात खास असलेला दिवस ठरला. टीम इंडियाने (Team India) टी-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) नाव कोरत भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघाने विश्वषचक आपल्या नावावर केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात कौतुकाचं, आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होतं. त्यावर अनेक मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) देखील व्यक्त होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
खरंतर वनडे विश्वषचक थोडक्यात हुकल्यावर टी20 विश्वचषकावर साऱ्यांच्या नजरा होत्या. सुरुवातीपासूनच भारतीयांची कामगिरी ही अत्यंत कौतुकास्पद राहिली. त्यानंतर फायनल तिकीट मिळवत पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वचषकाच्या जवळ पोहचला आणि तो मिळवला देखील. त्यामुळे अगदी समान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत या खेळाडूंचं अगदी भरभरुन कौतुक केलं जातंय. हृषिकेश जोशी, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, पुष्कर जोग, प्रसाद ओक, पृथ्वीक प्रताप अशा सगळ्यांनी आपल्या भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.
ही खरी फायनल - हृषिकेश जोशी
हृषिकेश जोशीने पोस्ट करत म्हटलं की, ही खरी फायनल... वेल प्लेड आफ्रिका, हार्ड लक, जिंकाल तुम्ही पुढे कधीतरी. पुढे त्याने म्हटलं की, एका मॅचला इतके टर्निंग पॉईंट्स कोहली, अर्शदीप, बुमराह, हार्दिक, सूर्या अफाट......
तसेच सई, अमृता यांनी देखील पोस्ट करत या चॅम्पियन्सचं भरभरुन कौतुक केलं आहे. त्यामुळे यंदा भारतीयांच विश्वचषकाचं स्वप्न हे पूर्ण झालं असून त्याचा आनंद देशभरात साजरा केला जातोय.
अनुष्का शर्माची पोस्ट
दरम्यान आता विराट कोहलीने त्याची निवृत्ती देखील घोषित केली आहे. त्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची पोस्ट देखील बरीच चर्चेत आलीये. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, आपल्या मुलीची सर्वात मोठी काळजी होती की, जेव्हा तिने सगळ्यांना खेळाडूंना रडताना पाहिलं तेव्हा त्यांना मिठी मारण्यासाठी कोणी असेल का? होय, पण 1.5 बिलियन लोकांना त्यांना मिठी मारली. अभूतपूर्व विजय आणि किती महान कामगिरी!! चॅम्पियन्स अभिनंदन! पुढे तिने म्हटलं की, "आणि म्हणून मी माणसावर (विराट कोहली) प्रेम करते. मी तुला माझं घर समजते, तुझे आभार. आता या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जा आणि माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये,"