
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli And Anushka Sharma : हार्ट इमोजी अन् "लव्ह यू", विराटच्या निवृत्तीनंतर पत्नी अनुष्का शर्माच्या भन्नाट पोस्टची चर्चा!
टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

IND Vs SA : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. या दिमाखदार विजयानंतर टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांनी स्वागत केलंय. तर त्याच्या लाखो चाहत्यांची मनं नाराज झाली आहेत. दरम्यान, निवृत्तीचा निर्णय तसेच टीम इंडियाच्या विजयानंतर विराटची पत्नी तथा अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या पतीसाठी समाजमाध्यमावर खास पोस्ट केली आहे. अनुष्का शर्माच्या या पोस्टची सध्या सगळीकडे विशेष चर्चा होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विराट कोहली भारतीय संघासाठी क्रिकेट खेळतोय. टीम इंडियाला T-20 विश्चचषक स्पर्धेत ट्रॉफी मिवळून द्यायची हे स्वप्न उराशी बाळगून तो अविरतपणे मैदानावर झुंद देत होता. आता मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करून टी-20 विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी भारतात आणली आहे. विशेष म्हणजे त्याने या अंतिम सामन्यात दिमाखदार कामगिरी करत भारतीयांचं मन जिंकलं आणि सामना संपल्यावर अखेर निवृत्ती घेतली.
View this post on Instagram
विराटने या सामन्यात 59 चेंडूंवर दोन षटकार आणि सहा चौकार लगावत 76 धावांचा तुफानी खेळ केला. त्याच्या या कामगिरीचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान, विराटच्या या निर्णयानंतर अनुष्का शर्माने खास पोस्ट केली. आपल्या पोस्टमध्ये "आणि म्हणून मी माणसावर (विराट कोहली) प्रेम करते. मी तुला माझं घर समजते, तुझे आभार. आता या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जा आणि माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये," असं अनुष्का शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
View this post on Instagram
अनुष्काच्या या पोस्टवर अनेक बड्या सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता सुनिल शेट्टी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, चित्रांगदा सिंह, काजोल, नेहा मलिक आदींनी विराट-अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा :
ट्रॉफी जिंकताच माही भाईच्या टीम इंडियाला खास शुभेच्छा, रोहितनेही दिली प्रतिक्रिया; आकाशाकडे बघून...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
