Pawankhind : 'पावनखिंड' चित्रपटावर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देखील पावनखिंड (Pawankhind) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Pawankhind : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पावनखिंड चित्रपटाचं कौतुक करत अनेक प्रेक्षकांनी तसेच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देखील पावनखिंड या चित्रपटाचं कौतुक केलं.
पावनखिंड या चित्रपटाच कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्या पिढ्यांना स्वाभिमान आणि संजीवनी देणारा आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास सर्वांसमोर आला पाहिजे. हा चित्रपट अत्यंत सरस पद्धतीनं तयार करण्यात आला आहे.'
पावनखिंड चित्रपटाच्या इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'अचानक मिळालेला छान आशीर्वाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेण्याची संधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीमला मिळाली तेव्हा त्यांना वीरांगना टिझर, मुख्य ट्रेलर, युगत मांडली गाणे आणि climax मधील काही भाग दाखवला. सुरुवातीला दिलेली 20 मिनिटांची वेळ बघता बघता 1 तासाची चर्चात्मक भेट झाली. त्यांनी लवकरच संपूर्ण चित्रपट पाहण्याची इच्छा दर्शविली आहे. दिलेल्या या वेळेसाठी पावनखिंडची संपूर्ण टीम तुमची खूप खूप आभारी आहे.'
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर 'पावनखिंड' नं घातला धुमाकूळ
सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई केली आहे. तर विकेंडला शुक्रवारी 1.02 कोटी, शनिवारी 1.55 कोटी आणि शनिवारी 1.97 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 16.71 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
- Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
