एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी 

Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत.

मुंबई: शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) या चित्रपटावरुन सुरू झालेला वाद अद्याप थांबण्याचं लक्षण नाही. या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram Rang) हे गाणं हटवावं अशी मागणी करत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही धाव घेण्यात आली आहे. त्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. आता त्यात अयोध्याच्या परमहंस आचार्य ( Paramhans Acharya) यांचा समावेश झाला आहे. त्यांनी तर शाहरुख खानला थेट जीवे मारण्याची धमकीच दिली आहे. 

Paramhans Acharya on Shahrukh Khan: अयोध्याच्या आचार्यांची शाहरुखला धमकी 

अयोध्याचे परमहंस आचार्य यांनी शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला विरोध केला आहे. शाहरुखने भगव्या रंगाचा अपमान केला असून त्यामागे हिंदुंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप त्यांनी केला. चित्रपट म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा बनला असून त्यामागून अनेक छुपे काळे धंदे केले जात असल्याचंही ते म्हणाले. 

परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आज अयोध्यामध्ये काही संघटनांच्या वतीनं शाहरुख खानच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ज्या दिवशी शाहरुख खान मिळेल त्या दिवशी त्याची चमडी काढेण, त्याला जिवंत जाळेन असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. 

एवढ्यावरच आचार्य थांबले नाहीत तर ते यापुढे जाऊन म्हणाले की, माझे लोक मुंबईमध्ये असून ते शाहरुख खानला शोधत आहेत. त्याला जो कोणी मारेल त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करणार आणि त्याचा खटलाही लढवणार असल्याचं आचार्य परमहंस यांना वादग्रस्त वक्तव्य केलं. 

Besharam Rang: भगव्या बिकिनीवरुन वाद 

पठाण सिनेमाचं पहिलं गाणं 'बेशरम रंग'  12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Dipika Padukone) आणि शाहरुख खानची केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमधील गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत आहे. 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला.

शाहरुख आणि दीपिकाचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरतीDombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget