एक्स्प्लोर

OTT Release This Week: बिंज वॉचिंगसाठी तयार राहा! OTT वर आला कंटेंटचा खजिना! ‘हे’ दमदार चित्रपट-सिरीज चुकवू नका

OTT This Week: BTS ची डॉक्युमेंट्री असो किंवा राणी मुखर्जीची ‘मर्दानी 3’, प्रेक्षकांसाठी विविध जॉनरमधील मनोरंजन उपलब्ध आहे.

OTT Release This Week: या आठवड्याचा वीकेंड मनोरंजनाने पुरेपूर भरलेला असणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि सिरीज रिलीज झाले असून बिंज वॉचिंगसाठी जबरदस्त ऑप्शन तयार झाले आहेत. अ‍ॅक्शन, थ्रिलर, हॉरर, फॅमिली ड्रामा ते म्युझिक डॉक्युमेंट्रीपर्यंत सगळ्या प्रकारचा कंटेंट यावेळी प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. या शुक्रवारी (27 मार्च 2026) OTT प्लॅटफॉर्मवर नव्या चित्रपट आणि सिरीजचा मोठा धडाका पाहायला मिळतोय. BTS ची डॉक्युमेंट्री असो किंवा राणी मुखर्जीची ‘मर्दानी 3’, प्रेक्षकांसाठी विविध जॉनरमधील मनोरंजन उपलब्ध आहे. पाहूया या आठवड्यात OTT वर काय नवीन आलंय. (OTT release)

‘ओ’रोमियो’

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ’रोमियो’ ही फिल्म 1990 च्या दशकातील मुंबईवर आधारित आहे. अफशा म्हणजेच तृप्ती  डिमरी) आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गँगस्टर हुसैन उस्ताराला म्हणजेच (शाहिद कपूर) डॉन जलालला मारण्यासाठी सुपारी देते. ही फिल्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 27 मार्चपासून रेंटवर उपलब्ध आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती फ्रीमध्ये पाहता येईल.

‘मर्दानी 3’

‘मर्दानी 3’ हा यश राज फिल्म्सचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. अभिराज मीनावाला दिग्दर्शित या चित्रपटात राणी मुखर्जी एसएसपी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसते. 93 मुली बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासात मोठं ह्यूमन ट्रॅफिकिंग रॅकेट उघड होतं. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर 27 मार्चपासून स्ट्रीम होत आहे.

‘काट्टान’

‘काट्टान’ ही तमिळ अ‍ॅक्शन-ड्रामा सिरीज आहे. एका डोंगरावर सापडलेल्या छाटलेल्या डोक्यापासून ही कथा सुरू होते आणि पुढे सस्पेन्सने भरलेली थरारक गोष्ट उलगडते. विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असलेली ही सिरीज जिओहॉटस्टारवर 27 मार्चपासून उपलब्ध आहे.

‘प्रोजापती 2’

अविजित सेन दिग्दर्शित ‘प्रोजापती 2’ हा बंगाली फॅमिली ड्रामा आहे. मिथुन चक्रवर्ती आणि देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित ही भावनिक कथा झी5 वर 27 मार्चपासून रिलीज झाली आहे.

‘समथिंग वेरी बॅड इज गोइंग टू हॅपन’

ही 2026 मधील सुपरनॅचरल हॉरर मिनीसीरीज आहे. हेली झेड. बॉस्टन यांनी ती तयार केली असून डफर ब्रदर्स यांनी प्रोड्यूस केली आहे. एका जोडप्याच्या आयुष्यातील शांत क्षण कसे भयावह अनुभवात बदलतात, याची ही थरारक कथा आहे. ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

‘बीटीएस द रिटर्न’

बाओ गुयेन दिग्दर्शित ‘बीटीएस द रिटर्न’ ही डॉक्युमेंट्री BTS च्या कमबॅकवर आधारित आहे. मिलिटरी सर्व्हिसनंतर पुन्हा एकत्र येत त्यांनी तयार केलेल्या ‘अरिरंग’ अल्बमची ही कहाणी आहे. ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर 27 मार्चपासून स्ट्रीम होत आहे.

‘फाती ने?’

फैसल हाशमी दिग्दर्शित ‘फाती ने?’ ही गुजराती हॉरर-कॉमेडी फिल्म आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या भुताटकी हवेलीत घडणाऱ्या घटनांवर आधारित ही कथा आहे. हा चित्रपट शेमारूमीवर 27 मार्चपासून पाहता येतो.एकंदरीत, या वीकेंडला OTT वर विविध जॉनरमधील दमदार कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या एंटरटेनमेंटचा फुल डोस घ्यायला तयार रहा!

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget