(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल
आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो.
Om Raut On Adipurush Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझरनंतर सैफच्या भूमिकेमुळे वादाला तोंड फुटलं आहे. याच वादावर ओम राऊत यानं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट उत्तर दिलं आहे. आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. मी सगळ्यांचं ऐकून घेतो आणि पुढे जातो. 95 सेकंदाच्या टीझरवरुन लोकं व्यक्त होत आहेत. जेव्हा पूर्ण फिल्म 12 जानेवारी रोजी रिलिज होईल त्यावेळी यामागे आमची काय इच्छा आहे हे आपल्याला कळेल.
तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल
हा चित्रपट तुम्ही थ्रीडीमध्ये बघा म्हणजे तुम्हाला याचा खरा आस्वाद मिळेल, असं ओम राऊत यानं म्हटलं आहे. हा आमच्या कामाचा भाग आहे. कित्येकदा काही गोष्टी लोकांना आवडत नाहीत. जेव्हा गोष्टी आवडतात तेव्हा उचलून धरल्या जातात. प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा हक्क आहे. लोकांच्या सूचनांची दखल आम्ही घेत आहोत. आम्ही सूचनांची नोंद घेत आहोत. जानेवारीत फिल्म जेव्हा रिलीज होईल तेव्हा प्रेक्षकांची कुठल्याही प्रकारे निराशा होणार नाही. मायबाप प्रेक्षकांसाठी आम्ही सिनेमे बनवतो. तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल, असंही ओम राऊतनं म्हटलं आहे.
या वादावर बोलताना याआधीही ओम राऊतनं स्पष्टीकरण दिलं होतं. ओम राऊत म्हणाला होता की, "आदिपुरुष' सिनेमाला नेटकरी ट्रोल करत आहेत याचं वाईट वाटत आहे. पण आश्चर्य वाटत नाही. 'आदिपुरुष' सिनेमा रुपेरी पडद्याचा विचार करुन बनवण्यात आला आहे. पण नेटकरी करत असलेलं ट्रोलिंग मी थांबवू शकत नाही. मोबाईवर पाहण्यासाठी हा सिनेमा नाही. या सिनेमाचा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करता आला असता तर युट्यूबवर प्रदर्शित केला नसता".
ओम राऊतनं म्हटलं होतं की,"सध्याच्या मुलांना रामायणाबाबत जास्त माहित नाही. त्यामुळे रामायणावर आधारित हा सिनेमा बनवला आहे. जेणेकरुन सिनेमाच्या माध्यमातून सिनेरसिकांना यासंदर्भात माहिती मिळेल. हा अॅनिमेशन सिनेमा नसून लाईव्ह अॅक्शन सीन्स या सिनेमासाठी चित्रित करण्यात आले आहेत.
सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित
या सिनेमातील सैफ अली खानच्या लूकवर हिंदू महासभा आणि भाजपसह अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावरदेखील चर्चेत आहे. 'आदिपुरुष' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. एकीकडे हा सिनेमा ट्रोल होत असताना दुसरीकडे अनेकांकडून सिनेमाचं कौतुकही होत आहे.
संबंधित बातम्या