एक्स्प्लोर

इंटिमेट सीन्स.. नको रे बाबा; कोरोनाचा मराठी सिनेमावर परिणाम होणार?

कोरोना टाळायचा असेल तर सेफ डिस्टन्स पाळायला हवा, असं असताना लॉकडाऊननंतर सिनेमावर याचा परिणाम होणार आहे. सेफ डिस्टन्स पाळतानाच इंटिमेट सीन शूट करणं जिकीरीचं होणार आहे. कारण कोरोना गेला तरी भीती लवकर जाणारी नाही.

काही दिवसांपूर्वी प्रख्यात दिग्दर्शक शुजित सरकार यांनी एक ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं, की लॉकडाऊननंतर सिनेमातले इंटिमेट म्हणजे प्रणयदृश्य शूट करायचा वेगळा विचार करायला हवा. त्यांच्या या ट्विटवरून ते ट्रोलही झाले. म्हणजे, कोरोनामुळे सध्या चाललंय काय.. तुम्ही बोलताय काय असंही लोक बोलले. पण त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नाही असं नाही. कारण कोरोनानंतर म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा सिनेमाची शुट्स पुन्हा सुरू होतील तेव्हा मराठीत काय चित्र असेल हे एबीपी माझाने काही दिग्दर्शक कलाकारांशी बोलून चाचपणी केली. मराठीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बोल्ड विषय येऊ लागले आहेत. एडल्ट कॉमेडीही येऊ लागली आहे. बॉईज, गर्ल्स, टाकटाक, इमेल फिमेल ही त्याची काही उदाहरणं. शिवाय वेबसीरीजही आहेतच. हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेमाही बोल्ड होतोय अशात कोरोना आल्यामुळे सेफ डिस्टन्सिंगचा मुद्दा आला. शिवाय कोरोनाची भीतीही आहेच मनात. मराठीत काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शक कलाकारांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की निदान मराठीमध्ये अशी प्रणयदृश्य पुढची काही महिने शुट करूच नयेत असं अनेकांना वाटतं. शिवाय, सिनेमा बनवताना अनेक लोकांचा गट एकत्र आलेला असतो, त्यामुळे त्यांची टेस्ट करणं.. लोकांमध्ये लक्षणं दिसत असेल तर तातडीने कळवणं अशा गोष्टीही करायला हव्या असं अनेकांनी सांगितलं. याबाबत बोलताना टकाटक या सिनेमाचा दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाला, 'लोकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे या वर्षात असे सीन शूट करताना दहादा विचार करायला हवा. शिवाय, लोकही पटकन तयार होतील की नाही हेही विचारात घ्यायला हवं. त्यापेक्षा काळजी घेतलेली बरी असं मत त्याने मांडलं. इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही : संदिप खरे आपण आत्ता रिबूट झोनमध्ये गेलो आहे. आलिंगन किंवा जवळीकीचे सीन शूट करणं लांबची गोष्ट आहे. आता एकूणच सिनेमाच शूट करणं अवघड होऊन बसलं आहे. आपल्याकडचे बरेच सिनेमे हे मुंबईतून बाहेर शूट होत असतात. अशावेळी मुंबईतून बाहेर पडणं आणि बाहेरच्या लोकांनी आपल्याला गावात घेणं हे किती जमू शकेल हे येत्या काळातच कळेल, असं दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितलं. त्याचवेळी ही स्थिती बदलेल असंही त्याने आवर्जून नमूद केलं. इमेल फिमेलमध्ये बोल्ड भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणाली, की कोरोनानंतर काही काळ इंटिमेट सीन शूट करूच नयेत. कारण, कोरोनाची लक्षणं लगेच कळत नाहीत. आपण कॅरिअरही असू शकतो. अशा सीनमुळे हे वाढीला लागेल. अशावेळी काही काळासाठी असे सीन देऊ नयेत. हा रोग ओसरल्यानंतरच असे सीन शूट करण्याचा विचार व्हावा.' तर भाग्यश्री न्हालवे म्हणाली, सध्या जे चालू आहे ते भयानक आहे. यानंतर जे काही घडेल तेही भयानक असेल. याचा परिणाम इंटिमेट सीन शूट करताना होणार आहे. आर्टिस्ट कोण आहे.. कसा आहे. त्याची हिस्टरी काय आहे याची काळजी भविष्यात घ्यावी लागणार आहे. सिनेमात स्पर्शाची भाषा महत्वाची असते. अशावेळी बेफिकीरी ही कुणाच्या जीवावरही बेतू शकतं. म्हणून सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आणि पुढच्या वर्षातच नव्याने विचार करावा.' Sandeep Khare | ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही!’ कवी, गीतकार संदीप खरे यांच्यासोबत सुरेल गप्पा! माझा कट्टा

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna On Vijay Deverakonda Cares: मासिक पाळीच्या वेदानादायी दिवसांत माझा नवरा..., पुरुषांकडून तुम्ही यापेक्षा जास्त काय अपेक्षा ठेवू शकता?; रश्मिका मंदनाच्या वक्तव्याची चर्चा
मासिक पाळीच्या वेदानादायी दिवसांत माझा नवरा...'; रश्मिका मंदनाच्या वक्तव्याची चर्चा
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Ashok Saraf Lamborgini Car Video Viral: अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
अशोक सराफांचा स्वॅग, करड्या रंगाचा कुर्ता अन् धोतर नेसलं अन् तरातरा चालत जाऊन लॅम्बोर्गिनीमध्ये बसले; 'तो' VIDEO व्हायरल
Tiger Shroff Juhu Attack: 'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती
'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?
IND vs NZ 4th T20 : भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
भारताविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडची दाणादाण! लॉकी फर्ग्युसन OUT; बदली खेळाडूची घोषणा, वैभव सूर्यवंशीचा काटा काढणाऱ्याला संधी
Embed widget