Nivedita Saraf : 'आज लक्ष्याची खूप आठवण आली', मित्राच्या लेकाचं कौतुक; निवेदिता सराफांनी अभिनय बेर्डेसाठी लिहिली खास पोस्ट
Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं पहिलं नाटक पाहून त्याच्या या नव्या नाटकासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Nivedita Saraf : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) हा सध्या 'आज्जीबाई जोरात' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयने देखील सिनेसृष्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती सध्या काय करते या सिनेमातून कामाला सुरुवात केली. पण सध्या अभिनय रंगभूमीवर रमला असून तो आज्जीबाई जोरात हे नाटक करत आहे. नुकतच निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी हे नाटक पाहिलं असून त्यांनी अभिनयच्या कामाचं भरभरुन कौतुक केलं आहे.
लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI बालनाट्य रंगभूमीवर घेऊन आला आहे. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे. निवेदिता सराफ यांनी हे नाटक पाहिल्यानंतर एक पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी लक्ष्याची देखील आठवण काढली आहे.
निवेदिता सराफ यांची पोस्ट काय?
निवेदिता सराफ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अभिनयसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'नुकताच आज्जीबाईजोरात हे नाटक बघायचा योग आला नाटक खूप छान आहे निर्मिती सावंत पुष्कर श्रोत्री जयवंत वाडकर सगळ्यांनी खूप उत्तम कामं केली आहेत लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन च खूप कौतुक पण सगळ्यात सुखद धक्का बसला अभिनय बेर्डे च काम बघून अप्रतिम काम केलंय त्यानी माझ्या बालमित्राची आमच्या लक्षाचीखूप आठवण आली त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच.'
View this post on Instagram
आज्जीबाई जोरात नाटकाविषयी...
हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. दरम्यान अभिनयचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे.
ही बातमी वाचा :
Bhagyashree Mote : शेवटी स्वामींचं बोलावणं आलंच... भाग्यश्री मोटेने सांगितला तिचा स्वामी अनुभव