(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एक्स-गर्लफ्रेंडची एन्ट्री? दीपिका पदुकोणच्या कॅमिओची जोरदार चर्चा!
Brahmastra : सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Brahmastra : सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मल्टीस्टारर या चित्रपटात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक कॅमिओ देखील दाखवण्यात येणार आहे. शाहरुख या चित्रपटात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. मात्र, आता रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही (deepika Padukone) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात दीपिकाची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप दीपिकाच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दीपिकाच्या नावामुळे चित्रपट चर्चेत!
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत, त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. रणबीरच्या या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणही महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचा चर्चेमुळे हा चित्रपट प्रसिद्धी झोतात आला आहे.
पाच भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट!
‘स्टार स्टुडिओ’, ‘धर्मा प्रोडक्शन’, ‘प्राइम फोकस’ आणि ‘स्टारलाईट पिक्चर्स निर्मित’ हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग या वर्षाच्या अखेरीस 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, आता त्यांची ही दीर्घ प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रणबीर आणि दीपिका शेवटचे 'ये जवानी है दिवानी'मध्ये एकत्र दिसले होते.
संबंधित बातम्या