एक्स्प्लोर

ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपालला एनसीबीचं समन्स, 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

दिपीका, सारा, श्रद्धा बॅालिवूड मधल्या या तीन सुपरस्टार अभिनेत्रींच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालचं नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं होतं. मात्र एनसीबी ने पहारा ठेवत आज रामपालच्या घरी धडकली.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकली. तब्बल 7 तासाच्या कारवाईनंतर एनसीबीनं अर्जुन रामपालला चौकशीसाठी 11 नोव्हेंबरला हजर राहण्याचे समन्स ही दिलं आहे. तसच त्याच्या घरातलं काही सामानं ही जप्त केलं. ज्यामध्ये भारतात बंदी असलेली काही औषधे आहेत. काल बॉलिवूड मधील निर्माते आणि निर्देशक फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी कारवाई करत एनसीबीने फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना अटक केली. या आधी सुद्धा अर्जुन रामपालच नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं होतं. मात्र एनसीबी ने पहारा ठेवत आज रामपालच्या घरी धडकली.

दिपीका, सारा, श्रद्धा बॅालिवूड मधल्या या तीन सुपरस्टार अभिनेत्रींच्या चौकशीनंतर एनसीबीच्या रडारवर होते बॅालिवूडचे तीन सुपरस्टार S R A म्हणजे शाहरुख खान, रणबीर कपूर आणि अर्जुन रामपाल. एनसीबी यांची कधी ही चौकशी करु शकते अशी चर्चा होती. पण एक महीना उलटून गेल्यानंतरही यांची चौकशी नाही करण्यात आली. कारण एक संपूर्ण महीना एनसीबी बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनवर काम करत होती. आता S R A मधल्या A पर्यंत एनसीबी पोहचली आहे. वांद्रे पश्चिमच्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावर अर्जुन रामपालचं घर आहे. जिथे आज सकाळी सात वाजता एनसीबीने रेड टाकली.

बॉलिवूड इंडस्ट्री मधील ड्रग्स कनेक्शनचा छडा लावण्यासाठी एनसीबी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बॉलीवूड मधील दोन बडी नावं समोर आली आहेत. एन सी बी ने काही दिवसांपूर्वी अब्दुल वाहिद नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. ज्याने फिरोज नाडियाडवालाची पत्नी शबाना सईदला ड्रग्स पुरवल्याची कबुली दिली तर अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या भावाला एनसीबीने अटक केली होती. ज्या नंतर अर्जुन रामपालच नाव चर्चेत आलं.

अर्जुन रामपाल सिनेमांमध्ये जरी काही विशेष करू शकला नाही तरी बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेत्यांशी त्या जवळचे संबंध मानले जातात. त्यामुळे अर्जुन रामपालचं नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर या कलाकारांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. या आधी सुद्धा बॉलिवूड मधील काही नावं समोर आली होती. मात्र एनसीबी ने या नावांवर शिक्कामोर्तब केलं नव्हतं पण त्याच नावांमध्ये एक नाव अर्जुन रामपालचही होतं.

येणाऱ्या दिवसांमध्ये बॉलीवूडमधील अजून काही बड्या कलाकारांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांच्या चौकशीनंतर एनसीबीने एक धडा घेतला की आधी सबळ पुरावे गोळा करायचे आणि नंतर या बड्या नावांवर कारवाई करायची जेणे करून ड्रग्स प्रकरणात समोर आलेल्या सेलिब्रेटींकडे बचावाचा मार्ग राहणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजितदादांचे आमदार परतीच्या वाटेवर? Special ReportMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshish Shelar PC FULL : आम्ही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका जिंकू, आशिष शेलारांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Kalki 2898 AD Movie Review :   कल्की 2898  एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Web Series Release On OTT In July :  जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
Embed widget