एक्स्प्लोर

National Award Winner Shailendra Singh Makes Debut In Marathi: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण; 103 मिनिटांच्या मन हेलावणाऱ्या सिनेमाची घोषणा, ट्रेलर पाहिलात?

National Award Winner Shailendra Singh Makes Debut In Marathi: शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रचंड गाजत आहे.

National Award Winner Shailendra Singh Makes Debut In Marathi: भारतीय चित्रपटसृष्टीत (Indian Film Industry) 25 वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, 72 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि 12 राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंह आता 'लाडू' (Ladoo Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत. हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शनाचे अनुभव गाठीशी असणारे शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शक (Marathi Movie Director) म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रचंड गाजत आहे.

दिग्दर्शकाचे आत्मीयतेचं पाऊल आणि भव्य कारकीर्द 

'पेज 3', 'कांचीवरम', 'हनुमान', 'कॉर्पोरेट' आणि 'डोर' यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या सिनेमांची निर्मिती करणारं, तसेच भारतातील पहिली पाकिस्तानी सिनेसृष्टीतील कलाकृती भारतात प्रदर्शित करणारे शैलेंद्र सिंह आपल्या या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाविषयी म्हणतात, "मी 72 सिनेमांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केलेत, पण दिग्दर्शक म्हणून मी केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहील आणि तो माझ्यासोबत कायम राहील. प्रदीप गोगटे खरोखरंच विलक्षण आहेत, ते आपल्या निःशब्द अभिनयातून एका माणसाचं संपूर्ण आयुष्य या पडद्यावर उभं करतात..."

या चित्रपटाची निर्मिती 'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' सह-निर्माती सोनिया नासेरी कोल यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली आहे.

'लाडू'ची मूक आणि हेलावणारी कथा

मुंबई, ठाणे आणि कर्जतच्या मातीवर कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित झालेला हा 103 मिनिटांचा मराठी चित्रपट मानवी संघर्षाची अत्यंत भावनिक आणि वास्तवावादी गाथा मांडतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवला जात आहे.

9 अस्सल मराठी गाणी

'लाडू' चित्रपटात 9 अस्सल मराठी गाणी आहेत, जी चित्रपटाच्या भावनिक प्रवासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. लवकरच या गाण्यांचा औपचारिक लॉन्च सोहळा होणार आहे.

पाहा ट्रेलर :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget