एक्स्प्लोर

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी उरकला साखरपुडा; नागार्जुनकडून फोटो शेअर, होणाऱ्या सुनेवर शुभेच्छांचा वर्षाव

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा पार पडला आहे.

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement :  दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला ( Sobhita Dhulipala) यांचा साखरपुडा पार (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement ) पडला आहे. या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो नागा चैतन्यचे वडील आणि सुपरस्टार नागार्जुन यांनी शेअर केले आहेत. नागार्जुन यांनी या फोटोसोबत खास नोटही शेअर केली आहे. चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नागार्जुन यांनी शेअर केले फोटो

नागार्जुन यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना नागार्जुन यांनी म्हटले की, आम्हाला आमचा मुलगा, नागा चैतन्य, शोभिता धुलीपाला यांचा आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.!!

शोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आनंदी जोडप्याचे अभिनंदन!
त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा, असे नागार्जुन यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले. 

गुलाबी साडी अन् केसात अबोली गजरा...

साखरपुड्यासाठी नागा चैतन्य आणि शोभिता यांनी पारंपरीक वेशभूषेला प्राधान्य दिले. फिकट गुलाबी रंगाची साडी आणि केसात अबोली गजरा या पारंपरिक लूकमध्ये  शोभिता नटली होती. तर नागार्जुनने व्हाईट कलरचा कुर्ता आणि उपरणं परिधान केले. दोघांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा अतिशय खासगी आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. नागा चैतन्य आणि शोभिता हे दोघांना 2022 पासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, या दोघांनी आपल्या नात्यावर अधिकृत भाष्य केले नव्हते. नागा चैतन्यचा पहिला विवाह सामंथा प्रभू सोबत झाला होता. मात्र, दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण झाल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

अनुरागच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत एन्ट्री

2015 मध्ये, शोभिताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी शोभिताला नामांकनही मिळाले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा शो 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. 2022 आणि 2023 मध्ये, शोभिताने दिग्दर्शक  मणिरत्नमच्या ऐतिहासिक महाकाव्य पोन्नियन सेल्वन (Ponniyin Selvan 1) आणि पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan 2) यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश  राणेंची प्रतिक्रिया
संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया
Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश  राणेंची प्रतिक्रिया
संजय शिरसाट आमचे मित्र, मात्र त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा; मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया
Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
Tax Regime: 12 लाखांच्या निर्णयानं नव्या कररचनेला अच्छे दिन, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला फायदेशीर, जाणून घ्या  
सगळीकडे नव्या कररचनेची जोरदार चर्चा, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला अजूनही फायदेशीर
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
Embed widget