एक्स्प्लोर
Raftaar-Manraj Wedding : रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, 2022 मध्ये झाला होता घटस्फोट
Raftaar-Manraj Wedding : रॅपर रफ्तार विवाहबंधनात अडकला असून त्याने ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Raftaar-Manraj Wedding
1/10

Raftaar-Manraj Wedding : रॅपर रफ्तार आणि फॅशन स्टायलिस्ट आणि अभिनेत्री मनराज जावंदा यांनी लग्न केले आहे. हे जोडपे अलिकडेच एका स्वप्नाळू लग्नात अडकले.
2/10

रॅपर रफ्तारने दुसरं लग्न केलं आहे. त्याने कॉस्ट्युम स्टायलिस्ट आणि अभिनेत्री मनराज जावंदासोबत लग्न केलं आहे.
3/10

रॅपर रफ्तारने शुक्रवारी, ३१ जानेवारी रोजी मनराज जवंदासोबत लग्नगाठ बांधली. आता या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
4/10

रफ्तार आणि मनराजने जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. त्याचं हे दुसरं लग्न आहे.
5/10

रफ्तारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन दिलं आहे की, "अधिकृतपणे श्रीमती आणि श्री. नायर मनराज आणि दिलीन."
6/10

रॅपर रफ्तारचं खरं नाव दिलीन नायर आहे. रफ्तार हा मल्याळी आहे, तर त्याची पत्नी मनराज ही शीख आहे.
7/10

यामुळेच रफ्तार आणि मनराज यांना विवाहसोहळा दोन पद्धतीने पार पडला. त्यांनी दक्षिणात्य आणि पंजाबी अशा दोन पद्धतीने लग्न केलं.
8/10

दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत.
9/10

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये रफ्तार आणि मनराज लग्नाच्या विधी करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
10/10

या खास प्रसंगी या जोडप्याने सोनेरी रंगाचे ऑफ-व्हाइट कपडे घातले होते.
Published at : 02 Feb 2025 07:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
