(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kranti Redkar : राजकारण नाही, समाजासाठी काम करायचं; राजकीय आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चांवर क्रांती रेडकरने दिला पूर्णविराम
Sameer Wankhede Kranti Redkar : समीर वानखडे आणि क्रांती रेडकर सध्या त्यांच्या मूळ गावी वरुड तोफा दौऱ्यावर आहेत.
Sameer Wankhede Kranti Redkar : एनसीबीचे (NCB) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhede) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या आपल्या कुटुंबासह वाशीम (Washim) जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी वरुड तोफा दौऱ्यावर आहेत. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली,"राजकारणात नाही पण समाजासाठी काम करायचं आहे".
समीर वानखडे आणि क्रांती रेडकरने पहिल्यांदाच माध्यमासमोर एकत्र येत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वानखडे परिवारातील कोणीतरी एक सदस्य राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. अभिनेत्री क्रांती रेडकर राजकारणात एन्ट्री करणार असल्याचंदेखील म्हटलं जात होतं. पण आता क्रांतीने राजकारण नाही पण समाजासाठी काम करायचं आहे, असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
View this post on Instagram
कुटुंबियांसोबत गावी येण्याबद्दल समीर वानखडे म्हणाले,"गावी एक वेगळा अनुभव मिळतो. लग्नानंतर पाच वर्षांनी मुलांसह क्रांती पहिल्यांदाच गावी आली आहे. मुलांना गाव आवडत असल्याचा आनंद आहे. क्रांतीलादेखील गावचं वातावरण आवडत आहे".
गावी पहिल्यांदाच येण्याबद्दल क्रांती म्हणाली,"कोणत्याही मुलीला सासरी जावं, सासरच्या मंडळींसोबत मिळून-मिसळून राहावं असं वाटत असतं. आता या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. ग्रामीण भाग मला खूप जवळून पाहायला मिळत आहे. आम्ही अडचणीत असताना आमचं गाव आमच्यासोबत होतं".
क्रांती पुढे म्हणाली,"गावात खूप माणुसकी आणि आपुलकी आहे. शहरात प्रामुख्याने स्वार्थी लोक असतात. शहरातला एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर आसपासची लोक मदतीला येतीलच असे नाही. शहरातील लोक तुम्ही कसे चुकलात आणि तुमचं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यात पुढे असतात. पण समोरच्याची चूक सांभाळून घेवून त्याला समजवण्याचा प्रयत्न गावाकडची मंडळी करतात".
संबंधित बातम्या