Mouni Roy : नागिन फेम मौनी रॉयची लगीनघाई; कोण आहे मौनीचा जोडीदार?
Roy, Suraj Nambiar Wedding जाणून घ्या मौनी रॉयचा होणारा पती सूरज नांबियारबद्दल..
Mouni Roy, Suraj Nambiar Wedding : छोट्या पडद्यावरील मालिकामध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी ही सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) आज (27 जानेवारी) रोजी लग्नगाठ बांधणार आहे. मौनी आणि सूरजचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. अनेक वर्ष मौनी सूरजला डेट करत होती. पण मौनीने तिच्या आणि सूरजच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. जाणून घेऊयात मौनीचा होणारा पती सूरजबद्दल...
सूरजचा जन्म कर्नाटकमधील बंगळूरूमध्ये झाला. तो दुबईमधील प्रसिद्ध बँकर आणि बिझनेसमॅन आहे. सूरजनं जैन इंटरनॅशनल रेजिडेंशियल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2008 मध्ये त्याने बंगळूरूमधील आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सिव्हिल इंजीनियरिंगच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतले होते. सूरजला ट्रॅव्हल करायला आवडते. सूरजचा भाऊ नीरज नांबियार हा पुण्यामधील इव्हेंच मॅनेजमेंच कंपनीचा को-फाऊंडर आहे.
सूरज हा अशोका इंडिया कंपनीमध्ये इंटर्न आहे. तो संयुक्त अमीरातमध्ये कॅपिटल मार्केट्सचा डायरेक्टर आहे. तसेच तो चार्टर्ड अल्टरनेटिव इन्वेस्टमेंट एनालिस्ट असोसिएशनचा सदस्य देखील आहे.
View this post on Instagram
2019 मध्ये मौनी सूरजला पहिल्यांदा दुबईत एका पार्टीमध्ये भेटली होती. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Neha Kakkar : 500 रूपयांच्या नोटा वाटणं नेहाला पडलं महागात; लहान मुलांनी घेरलं, पाहा व्हिडीओ
Mouni Roy Wedding : मौनी रॉयच्या हाताला लागली सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha