Mirzapur Season 3 Update: मिर्झापूरमध्ये फुलेराच्या सचिवजीं एन्ट्री, पण करणार तरी काय? गुड्डू भैय्या म्हणाले...
Mirzapur Season 3 Update: मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. असं म्हटलं जातंय की, पंचायत 3 मधील अनेक कलाकार मिर्झापूर 3 मध्ये पाहायला मिळणार आहेत.
Mirzapur Season 3 Update: मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनची (Mirzapur Season 3) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. सिझनची रिलीज डेट जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण सिरिज कधी रिलीज होणार याची वाट पाहत आहे. मिर्झापूरच्या मागच्या दोन्ही सिझनच्या यशानंतर आता तिसऱ्या सिझनकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यातच आता या सिझनविषयी आणखी एक अपडेट समोर आली आहे.
मिर्झापूरमधील गुड्डू भैय्या हे पात्र साकारणाऱ्या अली फजलने याविषयी माहिती दिली आहे. मिर्झापूर 3 मध्ये नुकत्याच आलेल्या पंचायत 3 मधील एका कलाकाराची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता फुलेरा मधील कोणता कलाकार मिर्झापूरमध्ये एन्ट्री करणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
मिर्झापूरमध्ये होणार 'या' अभिनेत्याची एन्ट्री
दरम्यान मिर्झापूरमध्ये दुसरा तिसरा कुणी येणार नसून सचिवजीं येणार आहे. त्यामुळे मिर्झापूर 3 मध्ये आपल्याला जितेंद्र कुमार पाहायला मिळणार आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिर्झापूर 3 मध्ये सचिव जी काय करणार आहे? याविषयी अली फजलने एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.
अली फजलने काय म्हटलं?
सचिवजींच्या एन्ट्री विषयी बोलताना अली फजलने म्हटलं की, जितेंद्र कुमारची एन्ट्री ही क्रॉस प्रमोशनचा भाग असणार आहे. तसेच जितेंद्र कुमार मिर्झापूरमध्ये काही कागदपत्रांसाठी येणार आहे. कालीन भैय्याच्या मृत्यूबाबत काही पुराव्यांची गरज असते. जितेंद्र कुमार फक्त दोन भागांसाठी मिर्झापूरमध्ये एन्ट्री करणार आहे.
गुड्डूचे अनेक शत्रू...कोणाकोणाला भिडणार?
मागील सीझनमध्ये गुड्डू पंडितने आपला सूड उगवताना अनेकांना शत्रू बनवले आहेत. मुन्ना भैय्याला संपवलं, कालीन भैय्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. आता कालीन भैय्याची फौज त्याच्या मागे लागली आहे. माधुरी यादव, छोटे शुक्लासोबत इतर काहीजण कालीन भैय्यासाठी झगडणार आहेत. या सगळ्यांच्या रडारवर गुड्डू पंडित आहे. त्याला संपवण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत. ट्रेलरच्या शेवटी, कालिन भैय्याचा एक दमदार संवाद आहे. 'ही गादी, ही परंपरा... बाबूजी आणि आम्ही तयार केली...आता असं करून दाखवणार की आजपर्यंत पूर्वांचलच्या इतिहासात कधीच घडले नाही.
View this post on Instagram