एक्स्प्लोर

Mirzapur Season 3 Trailer : कालीन भैय्या गॉन, गुड्डू भैय्या ऑन; सत्तेचा संघर्ष आणि रक्तरंजित सूडनाट्य, अंगावर काटा आणणारा 'मिर्झापूर-3' चा ट्रेलर आउट

Mirzapur Season 3 Trailer : गुड्डू भैय्याची सत्तेची महत्त्वाकांक्षा, आपली हुकूमत, सत्तेची गादी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नात असणारा कालीन भैय्या यांच्यातील संघर्ष दिसणार आहे.

Mirzapur Season 3 Trailer : गेल्या दोन वर्षांपासून चाहते 'मिर्झापूर सीझन 3'ची (Mirzapur Season 3)  आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर रिलीज झाला होता.'सिंह अजूनही जखमी आहे, पण नक्की परत येईल' असे म्हणत कालीन भैय्याच्या कमबॅकबद्दल भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता, 'मिर्झापूर-3' च्या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. गुड्डू भैय्याची सत्तेची महत्त्वाकांक्षा, आपली हुकूमत, सत्तेची गादी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नात असणारा कालीन भैय्या आणि या सगळ्यात सुरू असणारा शह-कटशह, सूडनाट्य दिसणार आहे. 

 'मिर्झापूर सीझन 3' मध्ये  यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो. 

'मिर्झापूर-3'चा दमदार ट्रेलर

ट्रेलरमध्ये गुड्डू पंडित (Ali Fazal) मिर्झापूरच्या गादीवर आपला हक्क सांगताना दिसणार आहे. मिर्झापूरच्या चौकात असलेला कालीन भैय्याचा पुतळा हातोड्याने तोडत 'कालीन भैय्या गॉन, गुड्डू भैय्या ऑन'असे म्हणताना दिसत आहे. कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठी आता गुड्डूसोबत असून त्याच्या महत्त्वकांक्षेला बळ देणार आहे. तर, गोलू (Shweta Tripathi) काही तरी वेगळं करण्याच्या तयारीत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

गुड्डूचे अनेक शत्रू...कोणाकोणाला भिडणार?

मागील सीझनमध्ये गुड्डू पंडितने आपला सूड उगवताना अनेकांना शत्रू बनवले आहेत. मुन्ना भैय्याला संपवलं,  कालीन भैय्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. आता कालीन भैय्याची फौज त्याच्या मागे लागली आहे. माधुरी यादव, छोटे शुक्लासोबत इतर काहीजण  कालीन भैय्यासाठी झगडणार आहेत. या सगळ्यांच्या रडारवर  गुड्डू पंडित आहे. त्याला संपवण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत. 

ट्रेलरच्या शेवटी, कालिन भैय्याचा एक दमदार संवाद आहे.  'ही गादी, ही परंपरा...  बाबूजी आणि आम्ही तयार केली...आता असं करून दाखवणार की आजपर्यंत पूर्वांचलच्या इतिहासात कधीच घडले नाही.

'मिर्झापूर-3' च्या या ट्रेलरमध्ये राजकारणासोबतच अॅक्शन, षडयंत्र, विश्वासघात आणि अनेक ट्विस्ट असल्याचे दिसत आहे. मिर्झापूरचा या सीझनमध्ये हिंसाचार, रक्तपात  दिसणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget