Malayalam Industry : अभिनेत्याकडून ड्रग्ज देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, 40 वर्षीय महिलेला तीन दिवस खोलीत कोंडून ठेवलं; निविन पॉलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल
#MeToo in Film Industry : मल्याळम अभिनेता निविन पॉली यांच्यावर महिलेनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Malayalam Film Industry : मल्याळम चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर मॉलिवूडमध्ये लैंगिक छळाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेक दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. अनेक महिला अभिनेत्रींनी समोर येत इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडली आहे. आता लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे.
अभिनेत्यावर बलात्काराचा गंभीर आरोप
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Malayalam Film Industry) दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत आणि यामध्ये आणखी एका #MeToo खुलाशानंतर मॉलीवुडमध्ये खळबळ माजली आहे. एका महिलेने प्रसिद्ध मल्याळम सिनेस्टार निविन पॉलीवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.
ड्रग्स देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप
न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम अभिनेता निविन पॉलीवर (Nivin Pauly) लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता निविन पॉली (Malayalam Actor Nivin Pauly) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे.
View this post on Instagram
निविन पॉलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
एका 40 वर्षीय महिलेने अभिनेता निविन पॉलीविरोधात लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतर मंगळवारी त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षभरापूर्वी दुबईत निविनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. दरम्यान, निविन पॉलीने आरोप नाकारले असून आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्व शक्य आणि कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं आहे.
तीन दिवस अन्न-पाण्याशिवाय कोंडून ठेवलं
महिलेच्या तक्रारीनुसार, पीडितेवर दुबईमध्ये निविन आणि त्याचा इतर पाच साथीदारांवर लैंगिक शोषण केल्याला आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी निविन पॉलीविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. महिलेने आरोप केला आहे की, तीन दिवस तिला अन्न-पाण्याशिवाय एका खोलील कोंडून ठेवण्यात आलं होतं. अंमली पदार्थ देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :