Marathi Movie Box Office Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ला 'अल्याड पल्याड'ची टक्कर, 'संघर्षयोद्धा'ची दमछाक; मराठी चित्रपटांनी किती केली कमाई?
Marathi Movie Collection Alyad Palyad : बॉलिवूडच्या या दोन चित्रपटांना 'अल्याड पल्याड' हा चित्रपट टक्कर देत आहे. 'अल्याड-पल्याड' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
![Marathi Movie Box Office Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ला 'अल्याड पल्याड'ची टक्कर, 'संघर्षयोद्धा'ची दमछाक; मराठी चित्रपटांनी किती केली कमाई? Marathi Movie Collection Alyad Palyad movie box office collection cross 2 crore rupees Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil movie struggle on box office Marathi Movie Box Office Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ला 'अल्याड पल्याड'ची टक्कर, 'संघर्षयोद्धा'ची दमछाक; मराठी चित्रपटांनी किती केली कमाई?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/f693e286cdab6901c7d0924063a560371718960060982290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Movie Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची जोरदार हवा सुरू आहे. तर, दुसरीकडे 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटाने आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. तिकिटबारीवर बॉलिवूडच्या या दोन चित्रपटांना 'अल्याड पल्याड' ( Alyad Palyad) हा चित्रपट टक्कर देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी मराठी बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. तर, दुसरीकडे 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची चांगलीच दमछाक होत आहे.
मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली होती. आता एकाच आठवड्यात चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'मुंज्या' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असून 'अल्याड पल्याड'ही त्याच धाटणीचा चित्रपट आहे. त्यामुळे तिकिटबारीवर हॉरर-कॉमेडीपटाचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चार दिवसात 1 कोटींची कमाई केली होती. आता एकाच आठवड्यात चित्रपटाने दोन कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर 'संघर्षयोद्धा'ची दमछाक
'अल्याड पल्याड' चित्रपटासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या जीवनपटावर आधारित 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
सॅनसिल्कच्या वृत्तानुसार, संघर्षयोद्धा सिनेमाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 9 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 16 लाख रुपये, चौथ्या दिवशी 9 लाख रुपये, पाचव्या दिवशी 4 लाख रुपये, सहाव्या दिवशी 4 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू फार काही चालली नाही. एका आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्राथमिक अंदाजानुसार, 53 लाखांच्या आसपास कमाई केली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे.
आजपासून 'गाभ' प्रदर्शित
बॉक्स ऑफिसवर 'अल्याड पल्याड'चा जोर असताना आजपासून 'गाभ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनुप जत्राटकर दिग्दर्शित चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर यांची भूमिका आहे. एका रेड्याच्या भोवती असलेली ही ग्रामीण भागातील रांगड्या मातीमधील प्रेम कथा आहे.
इतर महत्त्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)