एक्स्प्लोर

Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Varhadi Vajantri Marathi Movie: दिवाळी येताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि मिश्कील विनोदाचे बादशहा विजय पाटकर (Vijay Patkar) वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला असून, मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर ‘वऱ्हाडी वाजंत्री’ (Varhadi Vajantri) हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. मनोरंजनाचा मोठा डोस असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी कौटुंबिक विनोदी 'वऱ्हाडी वाजंत्री' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पक्का झाला आहे. लवकरच लगीनसराई सुरु होत असल्याने विजय पाटकर आपल्या सवंगड्यांसोबत रसिकांसाठी विनोदाचा हा बंपर आहेर घेऊन चित्रपट मंडपाच्या उंबऱ्यावर उभे आहेत. त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या स्वागतासाठी विनोदाचा हुकमी एक्का मकरंद अनासपुरे यजमान म्हणून मिरवणार असून, पॅडी कांबळे आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी ते उतावीळ झाले आहेत.

धमाल विनोदी कथानक

लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. लग्नाळू व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा 'मॅरेज इव्हेंट्स'नी घेतली आणि त्यासोबत 'शादीराम घरजोडे' जाऊन 'सुटाबुटातला मॅरेजगुरु' डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी-संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धमाल करत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झाला आहे. आजमितीस या बिलंदर अवलियाने आपल्या भन्नाट अक्कलहुशारीतून 99 जोड्या जुळवल्या आहेत. आता शतक पार करण्यासाठी तो उतावीळ झाला आहे. या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी त्याने चक्क दादासाहेबांची बहीण परी आणि ताईसाहेबांचा भाऊ युवराजला बोहल्यावर चढवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या प्रवासात अनेक गोष्टी घडणार आहेत.

मराठीतला मल्टीस्टारर चित्रपट

वैभव अर्जुन परब लिखित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'वऱ्हाडी वाजंत्री' हा चित्रपट 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 7 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget