एक्स्प्लोर

प्रेक्षकांनाच नाही तर, कलाकारांनाही ‘लोच्या झाला रे’ची उत्सुकता, चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित!

'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित करण्यात आला असून 4 फेब्रूवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Lochya Zala Re : अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची उत्सुकता होती त्या चित्रपटाचा ट्रेलर आज (24 जानेवारीला) दणक्यात लॉन्च करण्यात आला आहे. या सोहळ्याला अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित 'लोच्या झाला रे' हा चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush choudhary), सिद्धार्थ जाधव (siddhartha jadhav), वैदेही परशुरामी (vaidehi parashurami), रेशम टीपणीस मुख्य भूमिकेत आहेत. तर, सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर हेदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला होता. 

या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये झालं आहे. सयाजी शिंदे यांचा भाचा, अंकुश चौधरीच्या बायकोला भेटायला लंडनला येतात आणि तिथूनच सगळा लोच्या व्हायला सुरुवात होते. असं काहीसं या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटात वैदेही परशुरामी नेमकी अंकुशची बायको आहे का सिद्धार्थची? याबाबत झालेला गोंधळ आपल्याला चित्रपटात पाहायला मिळेल. या सगळ्या धावपळीत नक्की कोणाच्या आयुष्यात लोच्या होतोय, या सगळ्याची उत्तरे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील . 

या चित्रपटाबद्दल मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, "लोच्या झाला रे आमचा पहिला मराठी चित्रपट असून आम्ही सर्वच खूप उत्सुक आहोत. या चित्रपटासाठी आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहता, त्यांच्या सोयीसाठी बुक माय शो अॅपवर (Book my show) आम्ही दोन आठवडे आधीच शो बुकिंग उपलब्ध करत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीत हे पहिल्यांदाच घडणार आहे असंही ते म्हणाले."

तर ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, "या चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट खास आहे. तसेच प्रेक्षकही या चित्रपटावर भरभरून प्रेम करतील अशी आशा आहे." 

नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. हा धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस 4 फेब्रूवारी रोजी येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget