Kangana Ranaut Reaction On Jaya Bacchan: 'भांडकुदळ कोंबडी... बिग बींची पत्नी असल्यामुळे सगळे सहन करतात'; चिडखोर जया बच्चन यांच्यावर चिडली कंगना रनौत
Kangana Ranaut Reaction On Jaya Bacchan: जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर आता कंगना यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Kangana Ranaut Reaction On Jaya Bacchan: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या (Samajwadi Party Leader) जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा तिच्या वागण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन यांचा स्पष्टवक्तेपणा आणि सततची चिडचिड यामुळे त्या आधीच जोरदार ट्रोल होत असतात. अनेकदा जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर मीम्सही बनतात. अशातच आता चिडलेल्या जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन संसद भवनाच्या आवारात असून त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्या व्यक्तीला त्या रागानं ढकलून देतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी कमेंट द्यायला सुरुवात केली आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत (BJP MP Kangana Ranaut) यांनीही जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार कंगना रनौतनं इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, त्यासोबतच लिहिलंय की, "सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात, कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही..." दरम्यान, कंगना रनौतची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
जया बच्चन पुन्हा चिडल्या, यावेळी नेमकं घडलं काय?
बॉलिवूड अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जया बच्चन कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर उभ्या राहून त्यांच्या पक्षाच्या सदस्यांशी बोलत आहेत. अचानक एक माणूस तिथे येतो आणि खिशातून फोन काढून जया बच्चन यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. पण, त्यानंतर मात्र जया बच्चन त्या माणसाला जोरात ढकलतात आणि म्हणतात की, "तू काय करतोयस?..." नंतर त्या त्या माणसाकडे रागानं पाहत आतमध्ये निघून जातात. जया बच्चन जिथे चिडल्या, तिथेच बाजूला प्रियांका चतुर्वेदी आणि इतर काही खासदार उपस्थित होते. पण, नेमकं काय घडलं कुणाला फारसं कळलं नाही, सगळे एकमेकांकडे पाहत होते. नंतर, जया बच्चन यांच्या मागे आतमध्ये निघून गेले.
सर्वसामान्य व्यक्तीसोबत जया बच्चन जे वागल्या, त्याचा कंगना रणौतनं जोरदार निषेध केला. त्यानंतर कंगनानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. तसेच, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, "सर्वात बिघडलेली प्रिविलेज महिला... लोक तिचा राग सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे..."
कंगना रनौत जया बच्चन यांना म्हणाली, 'भांडकुदळ कोंबडी'
कंगना रनौत एवढ्यावरच शांत बसल्या नाहीत. त्यांनी जया बच्चन यांच्या पार्टीवर आणि त्यांनी त्यावेळी डोक्यावर जी टोपी घातली, त्यावर टिप्पणी केली आहे. त्या म्हणाल्या की, "ही टोपी जी त्यांनी त्यांच्या डोक्यावर घातली आहे, ती कोंबड्याच्या तुऱ्यासारखी दिसतेय आणि जया बच्चन स्वतः एका भांडकुदळ कोंबडीसारख्या दिसतायत... हे खरंच खूप अपमानास्पद आहे..."
कंगना रनौत यांच्या आधी नेटकऱ्यांनीही जया बच्चन यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, "आम्हाला खरोखर अमिताभ साहेबांची दया येते...", दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "ती खूप अहंकारी महिला आहे..." तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, "ती स्वतः फार अद्भूत आहे..." दरम्यान, यापूर्वीही आपल्या चिडचिड्या स्वभावामुळे आणि भांडणामुळे जया बच्चन चर्चेत आलेल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























