Jaya Bachchan On Operation Sindoor: जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मग 'ऑपरेशनला सिंदूर' असं नाव का दिलं? जया बच्चन यांचा मोदी सरकारला सवाल
Jaya Bachchan On Operation Sindoor: जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मग ऑपरेशनला सिंदूर असं नाव का दिलं? जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना मोदी सरकारला थेट सवाल केला आहे.

Jaya Bachchan On Operation Sindoor In Rajya Sabha: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session Of Parliament) 'ऑपरेशन सिंदूर'वर (Operation Sindoor) चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरवरील प्रश्नोत्तरांचा सिलसिला बुधवारीही सुरू राहिला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Samajwadi Party MP Jaya Bachchan) यांनीही ऑपरेशन सिंदूरवर अनेक प्रश्न विचारले. जया बच्चन म्हणाल्या की, सरकारनं दहशतवाद संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं? यासोबतच त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या नावावरही आक्षेप घेतला आहे. जया बच्चन म्हणाल्या की, जर कपाळावरचं कुंकूच पुसलं गेलं, तर मग ऑपरेशनला सिंदूर असं नाव का दिलं?
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर बोलताना, जया बच्चन यांनी सर्वात आधी पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या की, दहशतवादी कसे आले आणि इतके लोक कसे मारले गेले? त्या घटनेबद्दल मला खूप वाईट वाटतंय. जया पुढे म्हणाल्या की, तुम्ही असे लेखक ठेवले आहेत, जे खूपच मोठी नावं घेतात. हे 'सिंदूर' नाव कोणी दिलं? जर सिंदूरच नष्ट झालंय, तर ऑपरेशनला सिंदूर असं नाव का दिलं?
Priyanka don't control me 😭🤣
— Being Political (@BeingPolitical1) July 30, 2025
Jaya Bacchan ko Amitabh Bachchan nhi control kr paaye @priyankac19 kya control krengi. pic.twitter.com/zBh2ErgUDs
काश्मीर आमच्यासाठी स्वर्ग, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळालं?
सपा खासदार जया बच्चन म्हणाल्या की, जे यात्रेकरू तिथे (पहलगाम) गेले होते, ते तिथे का गेले? 370 हटवल्यानंतर ते छाती फुगवून तिथे गेले. ते या आत्मविश्वासानं गेले होते की, आता तिथे दहशतवाद संपला आहे. काश्मीर आमच्यासाठी स्वर्ग आहे, पण त्या बदल्यात त्यांना काय मिळालं? या सरकारने तिथे गेलेल्या, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांचा विश्वास तोडला आहे. ती कुटुंबं तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाहीत.
दारूगोळ्यानं काहीही होणार नाही, मानवता असायला हवी
जया बच्चन पुढे बोलताना म्हणाल्या की, तुम्ही त्या कुटुंबांची माफी मागितली का? ते आपलं कर्तव्य आहे. तुम्ही माफी मागावी. सरकारनं त्या कुटुंबांची माफी मागावी. संरक्षणमंत्री त्या दिवशी (सोमवार) मोठं बोलत होते. आम्ही तोफा खरेदी केल्या, आम्ही दारूगोळा खरेदी केला, आम्ही हे खरेदी केलं, ते खरेदी केलं.... त्याचं आपण काय करावं? आम्ही त्या 26 लोकांचे प्राण वाचवू शकलो का? दारूगोळ्यानं काहीही होणार नाही. मानवता असायला हवी.
मी तुम्हा सर्वांना नम्र राहण्याची विनंती करू इच्छितो. लोकांनी तुम्हाला ज्या आशेनं आणि विश्वासानं इथे पाठवलंय, त्याची काळजी घ्या. तुम्हाला मिळालेल्या पदाचे रक्षण करा, असंही जया बच्चन म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























