John Abraham : ‘द कश्मीर फाइल्स’ वादानंतर जॉन अब्राहमचं कपिल शर्मा शोवर मोठं वक्तव्य, म्हणाला ‘इथे आलो म्हणजे...’
John Abraham : बॉलिवूडचा हँडसम हंक स्टार जॉन अब्राहम सध्या त्याच्या नवीन चित्रपट 'अटॅक'मुळे चर्चेत आहे. तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जोरदार प्रमोशन करत आहे.
John Abraham : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या 'अटॅक' (Attack) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) प्रमोशनसाठी पोहोचला होता, मात्र आता त्याने कपिलच्या शोबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या खूप चर्चा आहे.
बॉलिवूडचा हँडसम हंक स्टार जॉन अब्राहम सध्या त्याच्या नवीन चित्रपट 'अटॅक'मुळे चर्चेत आहे. तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच जॉन त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. पण, कपिलच्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले म्हणजे तिकीट विक्री वाढेल असे नाही, असे वक्तव्य त्याने या मंचावर केले आहे. अर्थात ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादानंतर जॉन अब्राहमचे हे वक्तव्य सगळ्यांसाठीच धक्कादायक होते.
माझ्या चित्रपटासंबंधी प्रश्न विचारा!
जॉन अब्राहमने एका मुलाखतीदरम्यान नुकत्याच रिलीज झालेल्या 'द कश्मीर फाइल्स'च्या लोकप्रियतेबद्दल बोलताना म्हटले की, कपिलच्या शोमध्ये प्रमोशन केल्याने चित्रपटाची अधिक तिकिटे विकली जातील, असे नाही. या शोमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले नाही, परंतु तरीही त्याची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाली आहे.
जॉनने सांगितले की, त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिलेला नाही आणि त्याबद्दल त्याला काही बोलायचे नाही. त्यानंतर त्याने कार्यक्रमात उपस्थित माध्यमांना सांगितले की, मी येथे आपल्या आगामी 'अटॅक' या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी आलो असून, केवळ चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारले जावेत. ‘अटॅक’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जॉनला 'द कश्मीर फाइल्स'बद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने प्रसारमाध्यमांना दुसऱ्या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यापासून सावध केले.
‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
‘अटॅक पार्ट 1’चा ट्रेलर पाहून हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, हे लक्षात येत आहे. जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 1 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मुख्य भूमिका करण्यासोबतच जॉन अब्राहम चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. याशिवाय जॉन अब्राहम लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
हेही वाचा :
- Lock Upp : कंगनाच्या लॉकअपमध्ये आपापसांतचं भिडली ‘टीम ब्लू’, पूनम पांडेशी वादानंतर अंजली अरोराची टास्कमधून माघार!
- Bhagya Dile Tu Mala : नवी मालिका अन् नवी भूमिका, ‘रत्नमाला’ स्वीकारण्याबद्दल निवेदिता सराफ म्हणतात...
- The Kashmir Files : ज्यांना 'द कश्मीर फाइल्स'ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha