एक्स्प्लोर

Jaat Box Office Collection Day 14: सनीपाजीचा 'जाट' फ्लॉप! 14 दिवसांतही नफा तर दूरच, पण साधं बजेटही वसूल केलं नाही

Jaat Box Office Collection Day 14: 'जाट' रिलीज होऊन 14 दिवस झाले आहेत आणि चित्रपटाचा खर्चही अद्याप वसूल झालेला नाही. सनी देओलचा हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 100 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे.

Jaat Box Office Collection Day 14: 'गदर 2' (Gadar 2) नंतर, सनी देओल त्याच्या 'जाट' (Jaat Movie) या चित्रपटासह पडद्यावर परतला. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि निर्माते आणि प्रेक्षकांनाही त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. दरम्यान, आता या सर्व आशा धुळीस मिळाल्यासारखे वाटतात. 'जाट' प्रदर्शित होऊन 14 दिवस झाले आहेत आणि चित्रपटाचा खर्चही अद्याप वसूल झालेला नाही.

सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'जाट'नं पहिल्या आठवड्यात 61.65 कोटी रुपयांची शानदार कमाई केली. यानंतर 'केसरी 2' प्रदर्शित झाला आणि नवव्या दिवशी सनी देओलचा चित्रपट फक्त चार कोटी कमाई करू शकला. 'जाट' चित्रपटाचं कलेक्शन दहाव्या दिवशी 3.75 कोटी रुपये, अकराव्या दिवशी 5 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 1.85 कोटी रुपये होते. तेराव्या दिवशीही चित्रपट फक्त 1.84 कोटी रुपयांची कमाई करू शकला. आता चौदाव्या दिवसाचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.

'जाट' चित्रपटाचं चौदाव्या दिवसाचं कलेक्शन 

'जाट' चित्रपटानं चौदाव्या दिवशी (रात्री 11 वाजेपर्यंत) फक्त 1.09 कोटी रुपये कमावले आहेत. आता दोन आठवड्यांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन 79.22 कोटी रुपये झालं आहे. बजेटबद्दल बोलायचं झालं तर, सनी देओलचा हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 100 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. 'जाट'च्या संथ कलेक्शनवरून असं दिसून येतंय की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ शकतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनी देओलचा 'जाट' का फ्लॉप होणार?

'जाट' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, येत्या काळात अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर, 'जाट'ला दिलेल्या स्क्रिन्समध्ये नक्कीच घट होईल. त्यानंतर 1 मे रोजी अजय देवगणचा 'रेड 2' आणि संजय दत्तचा 'द भूतनी' हे चित्रपटही प्रदर्शित होतील. अशा परिस्थितीत 'जाट' पूर्णपणे नष्ट होणार हे निश्चित आहे.

'जाट' नंतर सनी देओल अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचा 'बॉर्डर 2', नितेश तिवारीचे 'रामायण' आणि 'लाहोर 1947' सारखे चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाच्या छायेत परदेशात अडकली मराठी अभिनेत्री; एकनाथ शिंदेंना कॉल करताच दुसऱ्या दिवशी मायदेशी परतली, पोस्ट चर्चेत
युद्धाच्या छायेत परदेशात अडकली मराठी अभिनेत्री; एकनाथ शिंदेंना कॉल करताच दुसऱ्या दिवशी मायदेशी परतली, पोस्ट चर्चेत
'पाखरा आझाद केलं तुला' फेम गीतकाराच्या स्कॉर्पिओला आग; 2 गाड्यांनी एकत्र घेतला पेट, रात्री नेमकं काय घडलं?
'पाखरा आझाद केलं तुला' फेम गीतकाराच्या स्कॉर्पिओला आग; 2 गाड्यांनी एकत्र घेतला पेट, रात्री नेमकं काय घडलं?
Subedar Review:सत्तरीच्या उंबरठ्यावर अनिल कपूरचा Action अवतार! आदित्य रावलचा धडकी भरवणारा व्हिलन, ‘सुबेदार’ कसा आहे?
सत्तरीच्या उंबरठ्यावर अनिल कपूरचा Action अवतार! आदित्य रावलचा धडकी भरवणारा व्हिलन, ‘सुबेदार’ कसा आहे?
'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप
'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
Embed widget