एक्स्प्लोर

'तुला थोबडवणार'... मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जान कुमारला मनसेचा इशारा

बिग बॉसमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला चांगलाच इशारा दिला आहे.

मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला चांगलाच इशारा दिला आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.

बिग बॉसची शूटिंग बंद पाडू - अमेय खोपकर

कलर्स चॅनेल आणि जान सानूने 24 तासाच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसची शूटिंग बंद पाडू असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.  जान सानूचं थोबाड फोडून आम्ही त्याला धडा निश्चित शिकवू आणि याला भविष्यात इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे ही पाहू, असंही खोपकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

जान सानूवर नेपोटिझमचा आरोप बिग बॉस 14 मध्ये सतत काही ना काही गोंधळ सुरु असतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा बिग बॉसच्या घरात देखील जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रीयन गायक राहुल वैद्यने एलिमिनेशनमध्ये जान कुमार सानू नॉमिनेट करताना नेपोटिझमचा आरोप केला होता. जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर त्याच्या आईने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जानमध्ये प्रतिभा आहे.  घरातील लोक तसेच पब्लिक देखील जानला त्याच्या टॅलेंटमुळं प्रेम करत आहेत, असं जानच्या आईनं म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget