FIR Against Ranveer Allahbadia: रणवीर अलाहबादिया, समय रैनासह 5 जणांविरोधात FIR; प्रकरण तापल्यानंतर B Praak चाही मोठा निर्णय, VIDEO शेअर
FIR Against Ranveer Allahbadia: मुंबईपाठोपाठ आता गुवाहाटीतही रणवीर अलाहबादिया, समय रैनासह 5 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

Assam Police Registered FIR Against Ranveer Allahbadia: दिवसेंदिवस प्रसिद्धीझोतात येणारं आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) अखेर अडचणीत सापडलंच. एकीकडे रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia), समय रैना (Samay Raina), अपूर्व मखीजा (Apoorva Mukhija) आणि इतरांविरुद्ध आणि 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरुद्ध मुंबईत (Mumbai News) तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच आता कठोर पावलं उचलत आसाम पोलिसांनीही याप्रकरणी FIR दाखल केला आहे. त्यामुळे 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या आयोजकांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी सोशल मीडिया (Social Media) पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, बी प्राकनं (B Praak) रणवीरच्या पॉडकास्टला जाणंच रद्द केलं आहे. व्हिडीओ शेअर करून माहिती देण्यात आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट केलं आहे की, "गुवाहाटी पोलिसांनी (Guwahati Police) काही युट्यूबर्स (Youtubers) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स (Social Media Influencers) आशिष चंचलानी (Ashish Chanchlani), जसप्रीत सिंह (Jaspreet Singh), अपूर्व माखीजा, रणवीर अलाहबादिया, समय रैना आणि इतरांविरुद्ध इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि अश्लील भाष्य केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे."
समय रैना, रणवीर अलाहाबादियासह इतरांविरुद्ध FIR
ट्वीटमध्ये आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले आहेत की, या सर्वांवर विविध कलमं लावण्यात आली आहेत, ज्यामध्ये आयटी अॅक्टचा देखील समावेश आहे. रणवीरनं शोमधील स्पर्धकाला असा प्रश्न विचारला होता की, तो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं, कारण तो प्रश्न आई-वडिलांशी संबंधित होता. मनोज मुंतशीरपासून ते मालिनी अवस्थी, गौरव तनेजा आणि इतर सेलिब्रिटी युटुबर्सनीदेखील रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
बी प्राकनं Video शेअर करत रणवीरच्या पॉडकास्टमध्ये जाणं कॅन्सल केलं
बी प्राकनं व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला, 'राधेय राधेय. मी आता रणवीरच्या पॉडकास्टमध्ये जाणार होतो. बिअर बायसेप्स... पण आता मी जाणार नाहीय, मी कॅन्सल केलंय. कारण तुम्हाला माहिती आहे की, त्यांची विचारसरणी किती वाईट आहे. आणि समय रैनाच्या शोमध्ये शब्द कसे वापरले गेले आहेत. मला वाटतं ही आपली भारतीय संस्कृती नाहीये. ही आपली संस्कृती नाही. तुम्ही तुमच्या पालकांबद्दल काय बोलत आहात? कोणत्या गोष्टी सांगत आहात? हा विनोदी आहे, ही कॉमेडी नाहीये. अजिबातच नाही. ही स्टँडअप कॉमेडी नाहीये.
View this post on Instagram
बी प्राक रणवीर अलाहाबादियावर संतापला
तो पुढे म्हणाला की, "लोकांना शिवीगाळ करणं, लोकांना शिवीगाळ करायला शिकवणं. ही कोणती पिढी आहे? त्या शोमध्ये एक सरदारजी येतात. सरदार जी, तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही शीख आहात आणि ही गोष्ट तुम्हाला शोभते? आई कशी आहे? तू वेडा आहेस? तुम्ही काय शिकवत आहात? आणि ते सरदार जी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत की, मी शिवीगाळ करतो. तर यात काय अडचण आहे? अरे, आम्हाला अडचण आहे आणि असणारच, का नसावी?"
महत्त्वाच्या इतर बातम्या :























