Ranveer Allahbadia Vulgar Remark: रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत विचारला वल्गर प्रश्न; युजर्स म्हणाले, "तुझ्या बापाला जाऊन विचार..."
Indias Got Latent: रणवीर अल्लाहबादियाला समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आला होता. शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं विचारलेल्या वल्गर प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Indias Got Latent: कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) शो 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) नेहमीच चर्चेत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे, या शोवरुन अनेकदा कॉन्ट्रोवर्सीसुद्धा (Ranveer Allahbadia Controversy) झालेली आहे. काही दिवसांपूर्वी या शो विरोधात एक तक्रारही दाखल करण्यात आली होती. अशातच आता समय रैनाच्या शोच्या एका नव्या वादग्रस्त एपिसोडमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका नव्या एपिसोडसाठी युट्यूबर आशिष चंचलानी (Youtuber Ashish Chanchlani), अपूर्वा मुखिजा (Apoorva Mukhija), रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) सारखे स्टार्स दिसले आहेत. अशातच रणवीर अल्लाहबादियानं शोमध्ये असा प्रश्न विचारला की, सोशल मीडियावर त्याच्यावर बरीच टीका होत आहे. युजर्स रणवीर इलाहाबादियाला ट्रोल करत आहेत.
रणवीर अल्लाहबादियाच्या 'त्या' प्रश्नावरुन चहुबाजूनं टीकेची झोड
रणवीर अलाहाबादियानं शोमधल्या एका स्पर्धकाला विचारलं की, "तुम्हाला तुमच्या पालकांना आयुष्यभर इंटिमेट होताना पाहायचं आहे की, तुम्हाला एकदा ते इंटिमेट होताना त्यांच्यामध्ये सामील व्हायला आवडेल?" रणवीरचा हा प्रश्न ऐकताच समय रैना मध्ये पडतो आणि म्हणतो की, "हे सर्व प्रश्न त्याच्या पॉडकास्टमधले रिजेक्टेड प्रश्न आहेत. हा काय प्रश्न आहे...?" शोमधला हा भाग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तेव्हापासूनच रणवीर अल्लाहबादिया नेटकऱ्यांच्या टीकेच्या अग्रस्थानी आहे. YouTube वर अनेक क्रिएटर्सनीसुद्धा रणवीर अल्लाहबादियावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, त्यांनी त्याला खडे बोल सुनावणारे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच, ट्विटरवरही रणवीर अल्लाहबादियाला जोरदार ट्रोल केलं जात आहे.
नेटकऱ्यांकडून रणवीर अल्लाहबादियाला जोरदार ट्रोल
एका युजरनं लिहिलं आहे की, "हा प्रश्न जाऊन तुझ्या वडिलांना विचार. किंवा तुझ्या पार्टनरला तिच्या वडिलांना जाऊन विचारायला सांग. लाज वाटली पाहिजे... आमच्या मनात जे काही तुझ्यासाठी होतं, हा प्रश्न विचारुन तू ते सर्व गमावलं आहेस... मला वाटायचं की, ज्याला मी सब्सक्राइब केलंय, ते एक उत्तम व्यक्तीमत्त्व होतं, पण तू तर खूपच घाण आहेस..."
दुसऱ्या एका युजरनं लिहिलं आहे की, "सध्याच्या जगात कॉमेडी म्हणजे शिवीगाळ, अश्लीलता आणि एकमेकांवर जोक करण्यावर आली आहे. जसपाल भट्टी, जॉनी लिवर आणि राजू श्रीवास्तव यांसारखं ह्यूमर आता मिसिंग आहे."
तसेच, आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, लाज वाटली पाहिजे, असे प्रश्न विचारताना. तसेच, काही युजर्सनी त्याला बायकॉट करण्याची विनंती केली आहे आणि त्याचे पॉडकास्ट न पाहण्याचाही सल्ला दिला आहे.
दरम्यान, रणवीर अल्लाहबादिया बियर बाइसेप्स नावाचं युट्यूब चॅनल चालवतो. या चॅनलवर मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत रणवीर पॉडकास्ट करतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
"आई-वडिलांना शारीरिक संबंधावेळी बघणार का...", रणवीर अलाहाबादिच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
