एक्स्प्लोर

India Biggest Box Office Flop Movie: बॉक्स ऑफिसवरची आजवरची सर्वात फ्लॉप मूव्ही, ज्यामुळे इंडस्ट्रीनं 99.99 टक्यांचा सोसला तोटा, अर्धवटच सिनेमा रिलीज केला

India Biggest Box Office Flop Movie: अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म प्लॉप होण्यासाठी कारण सांगितलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, The Lady Killer अपूर्णच रिलीज झाली होती. याचा क्लायमॅक्सही पूर्ण शूट केला नव्हता.

India Biggest Box Office Flop Movie: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) दररोज म्हटलं तरी अनेक सिनेमे रिलीज होत असतात. त्यातले काही गाजतात तर काही सुपरफ्लॉप ठरतात. सध्या तर ओटीटीमुळे (OTT Movie) कित्येक नवे सिनेमे येतात, पण सगळेच चर्चेत राहतात असं नाही... आज आम्ही अशाच एका बॉलिवूड सिनेमाबाबत (Bollywood Movie) सांगणार आहोत, ज्याची बजेट तर आभाळाएवढं होतं, पण त्या सिनेमानं केलेली कमाई मातीच्या कणाएवढीही नव्हती. कोट्यवधींच्या भांडवलात हा चित्रपट तयार झाला आणि रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) मात्र जोरात आदळला. ही फिल्म तयार होण्यासाठी तब्बल 45 कोटींचं भांडवलं लागलं होतं. हा सिनेमा निर्माते, दिग्दर्शकाना घेऊन खड्ड्यात गेलाच, पण या सिनेमामुळे इंडस्ट्रीला तब्बल 99.99 टक्क्यांचं नुकसान झालं होतं. कारण, कमाई फक्त 60 हजार रुपयांची केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटात अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हे दोन स्टार्स झळकले होते. 

सिनेमाची 500 तिकिटही विकली गेली नाहीत... 

आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप ठरलेला हा सिनेमा क्राईम-थ्रीलर जॉनरचा होता. हा सिनेमा भूषण कुमार यांच्या टी-सीरीज बॅनर अंडर बनवण्यात आला होता. असं सांगितलं जात आहे की,  2023 मध्ये या फिल्मची दुसऱ्यांदा शुटिंग झाल्यामुळे याचं बजेट वाढलं होतं. पण, नशीब एवढं खराब होतं की, रिलीजनंतर या फिल्मला कुणी डिस्ट्रीब्युटर मिळालाच नाही. पहिल्या दिवशी भारतात फक्त 293 तिकीटं विकली गेली होती. याचं लाईफटाईम कलेक्शन 1 लाख रुपयांपेक्षाही कमी होतं. 

अर्धवट फिल्म केलेली रिलीज 

अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म प्लॉप होण्यासाठी कारण सांगितलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, The Lady Killer अपूर्णच रिलीज झाली होती. याचा क्लायमॅक्सही पूर्ण शूट केला नव्हता. दिग्दर्शकांनी सुरुवातीला ही गोष्ट मान्य केली होती. पण, नंतर मात्र अपूर्ण फिल्म रिलीज केल्याचं अमान्य केलं होतं. असंही म्हटलं जातं की, फिल्मला फक्त एक टोकन रिलीज मिळाली होती. मेकर्सनी डिसेंबर 2024 मध्ये याच्या स्ट्रिमिंगसाठी नेटफ्लिक्ससोबत डीलही केली होती. पण, यासाठी त्यांना फिल्मला नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज करायचं होतं. कारण जर असं केलं नसतं, तर डील अमान्य झाली असती. याच कारणानं त्यांनी अपूर्ण राहिलेली फिल्म रिलीज करून टाकली होती. 

कुठे पाहु शकता 'द लेडी किलर'? 

फिल्मचं प्रमोशनही केलं नाही. ट्रेलर रिलीजसाठी एक इव्हेंट पार पडला होता, पण त्यानंतर अॅक्टर्सनी याचं कोणतंही प्रमोशन केलं नाही. त्यानंतर मूव्ही रिलीज झाल्यानंतर याचा परफॉर्मन्स एकदम खराब होता. तिकीटं विकणं बंद झालेली. नंतर तर, स्ट्रीमिंग रिलीजही कॅन्सल केली होती. कारण, नेटफ्लिक्सनंही फिल्मचा रिस्पॉन्स पाहून एक पाऊल मागे टाकण्यास सुरुवात केली होती. 'द लेडी किलर'ला सप्टेंबर 2024 मध्ये टी-सीरीजसाठी  YouTube चॅनलवर मोफत रिलीज करण्यात आलं. YouTube वर ही फिल्म 3.5 मिलियन वेळा पाहिली गेली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Amitabh Bachchan Love Story: जया, रेखा साऱ्या नंतर, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बिग बींचं 'या' तरुणीसोबत जुळलेलं सूत, लग्नाच्या आणाभाका घेऊनही अधुरीच राहिली लव्हस्टोरी...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Embed widget